World Cup 2023 Opening Ceremony During India Vs Pakistan Icc Cwc 2023 Game Arijit Singh To Perform Report | IND Vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK, World Cup 2023 : विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी (opening ceremony) कार्यक्रम न झाल्यामुळे चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झाला होता. न्यूझीलंड आणि इंग्लंड (ENG vs NZ) यांच्यामध्ये विश्वचषक 2023 चा सलामीचा सामना झाला होता. या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनीचा (opening ceremony) कार्यक्रम झाला नव्हता. ओपनिंग सेरेमनी न होण्याचे कारणही अस्पष्ट होते. त्यावेळी बीसीसीआयवर (BCCI) अनेकांनी टीकाही केली होती. पण रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यादरम्यान बीसीसीआय ओपनिंग सेरेमनीचे (opening ceremony) आयोजन करण्याचा विचार करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) आमनासामना होणार आहे. त्या सामन्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचे आयोजन करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. 

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ओपनिंग सेरेमनी

रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. या सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लाइट शो, डान्स  परफॉर्मेंस आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांचा लाइव्ह परफॉर्मेंस होणार आहे. त्याशिवाय भारत पाकिस्तान सामन्यावेळी खास सेलिब्रेटिंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे.  

मोठी सुरक्षा व्यवस्था 

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याआधी स्टेडिअम उडवून देऊ, असा धमकीचा इमेल आला. त्यानंतर गुजरात पोलीस सतर्क झाले आहे. गुजरात पोलीस, एनएसजी, आरएएफ आणि होम गार्ड्स यांच्यासह विविध एजन्सीचे 11 हजार पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी तैणात करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था तीन लेअरमध्ये असणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना स्पेशल – 

प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची क्रेझ असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकादरम्यान सामने होतात. त्यामुळे दोन्ही देशातील चाहत्यांच्या या सामन्याकडे नजरा असतात. पाकिस्तान संघाने स्पर्धेत लागोपाठ दोन विजय मिळवले आहेत. पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भारतीय संघानेही बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. दोन्ही संघ भन्नाट फॉर्मात आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात रोहितसेनेचे पारडे जड आहे. भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आतापर्यंत सातवेळा पराभव केला आहे.



[ad_2]

Related posts