Virat Kohli Vs Naveen Ul Haq Lucknow Super Giants Ind Vs Afg World Cup Match Latest Marathi News Udpate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Afghanishan, World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) या दोन संघामध्ये सामना सुरु आहे.  टीम इंडिया (Team India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanishan) असा सामना असला तरी, चर्चा विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल-हक (Naveen-Ul-Haq) ची आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच नवीन उल हक आणि विराट कोहली सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यामध्ये लखनौ सुपर जायंट्स संघानेही उडी घेतली आहे. लखनौने नवीन उल हकला ट्रोल केलेय. आम कब नहीं खाना चाहिए?  असे म्हणत लखनौने ट्वीट केलेय. हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आयपीएलमधील वादानंतर नवीन उल हक याने आंब्याचे फोटो पोस्ट करत विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तोच संदर्भ पकडत लखनौने नवीनवर निशाणा साधला आहे. आयपीएलनंतर कोहली आणि नवीन उल-हक आमने-सामने येणार असल्याने आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. 

लखनौ सुपर जायंट्सने आपल्या अधिकृत ट्वीटरवर आंब्याचा फोटो पोस्ट केले आहे. त्यामध्ये आम कब नहीं खाना चाहिए? असे लिहिले आहे. त्याखाली चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. आज भारत जिंकला पाहिजे, असे एका चाहत्याला लखनौने उत्तर दिलेय. लखनौच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

कोहली आणि नवीन उल-हकची टक्कर –

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा कट्टर वैरी नवीन उल-हक यांची दोन वर्षानंतर एकदिवसीय किक्रेटमध्ये वापसी झाली आहे. अफगाणिस्तानचं कर्णधारपद हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आल्यानंतर नवीन-उल-हकचं वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानच्या संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे आज या दोन्ही खेळाडूंमधील टशन पुन्हा एकदा दिसून येणार आहे. 

कोहली आणि नवीन उल-हक आमने-सामने
आयपीएल 2023 च्या हंगामात सर्वाधिक चर्चा झाली ती, कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील वादाची. 1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला. लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भरमैदानात भिडला होता. नंतर या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातही वादही झाला होता. आता नवीनच्या पुनरागमनानं 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यानं पुन्हा एकदा उत्साहाला उधाण आलं आहे. 



[ad_2]

Related posts