MS Dhoni Retire or Not He Will Continue to Appear In Advertisements; धोनी है तो बात होनी है! मैदानात तर हात पकडूच नाही शकत, आता तर बच्चन, रणवीर, कोहलीला टाकलं मागे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: महेंद्रसिंग धोनी… ‘सिर्फ नाम ही काफी है’, हे वाक्य धोनीसाठी अगदी साजेसे आहे. देशभरात असे अनेक क्रिकेटप्रेमी आहेत जे मोठ्या संख्येने आहेत फक्त धोनीला खेळताना पाहण्यासाठी सामने पाहायला जातात. यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातील प्रसंग तर आपण पाहिला आहे. पाऊस पडत असतानाही एकही चाहता मैदान सोडून गेला नाही, इतकेच नव्हे तर सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार हे कळल्यावर चाहत्यांनी हॉटेल्स हाऊसफुल असल्याने त्यांनी चक्क रेल्वे स्टेशनवर मुक्काम ठोकला. कारण धोनीला अंतिम सामन्यात खेळताना पाहायचे होते. हा धोनी फक्त क्रिकेटपुरता नाही तर बिझनेस, जाहिरात क्षेत्रातही तितकाच अग्रेसर आहे.क्रिकेट जगतावर आणि चाहत्यांवर राज्य करणारा धोनी जाहिरातींच्या दुनियेतही चांगलाच बोलबाला आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की धोनी क्रिकेट खेळत राहो किंवा नाही, तो त्यांचा हिरो कायम राहील. कारण त्याचे त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आयपीएल २०२३ नंतर धोनी निवृत्ती घेणार या चाचा संपूर्ण सीझनभर सुरु होत्या आणि आता धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने आयपीएल २०२३ चे जेतेपदही जिंकले आहे.

तू कायमच हिरो असशील

धोनी पुढील वर्षी आयपीएलमध्ये परतणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धोनीने विजयानंतर सांगितले की, “माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, पण लोकांचे प्रेम पाहून मला आणखी खेळायचे आहे.” नितीन सैनी, व्हीपी (मार्केटिंग), कॅडबरी चॉकलेट्स आणि ओरियो कुकीजचे निर्माते मॉंडेलेझ म्हणाले, “ओरियोचे धोनीसोबत यशस्वी सहकार्य राहिले आहे आणि तो भविष्यातही आमच्या प्रवासाचा एक भाग असेल.”

अधिका-यांनी सांगितले की धोनीचा शांत स्वभाव आणि व्यक्तिमत्व, काही युवा खेळाडूंच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या विरूद्ध धोनी आहे, जे चाहत्यांना आणि ब्रँड्सना सारखेच आकर्षित करते. टेलिव्हिजन प्रेक्षक मापन फर्म TAM मीडिया रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल.व्ही. कृष्णन म्हणाले, “एमएस धोनी त्याच्या चाहत्यांशी अधिक जोडलेला आहे, जे सध्या सर्व क्रीडापटूंच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ब्रँड्सना तेच हवे असते. तो खेळत राहो वा नाही, ते कायमच धोनीशी जोडलेले असतील.”

ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, ४१ वर्षीय धोनीने गेल्या वर्षी अमिताभ बच्चन, रणवीर सिंग आणि विराट कोहली यांना मागे टाकत जास्तीत जास्त ब्रँडला सपोर्ट केला आहे. TAM AdEx च्या सेलिब्रिटी एंडोर्समेंट रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

३० ब्रँड्स

एमएस धोनीने ३० ब्रँडससाठी जाहिराती केल्या आहेत. यामध्ये Mastercard, Oreo, Jio Cinema, Skipper Pipe, Fire-Bolt आणि Gulf Oil सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. इतर ब्रँड्सशी तो अलीकडेच जोडला गेला आहे त्यात अनाकॅडमी, भारत मॅट्रिमोनी, नेटमेड्स आणि ड्रीम11 यांचा समावेश आहे. त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ४३ दशलक्षाहून अधिक आहेत.

क्रीडा आणि मनोरंजन कंपनी असलेल्या रिती ग्रुपचे अध्यक्ष अरुण पांडे म्हणाले, “माही खूप विनम्र आणि लोकांना आपलसं करणारा माणूस आहे.” हेच चाहते आणि ब्रँड्सना आकर्षित करते. निश्चितच, त्याने क्रिकेटच्या मैदानावर वेळोवेळी स्वतःला यशस्वीपणे सिद्ध केले आहे.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

१०४० कोटींची संपत्ती

इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार धोनीची एकूण संपत्ती १०४० कोटी रुपये आहे. जाहिरातीव्यतिरिक्त, त्याने अनेक क्रीडा आणि डायरेक्ट-टू-कंज्यूमर व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये फिनटेक स्टार्टअप खतबुक, प्री-ओन्ड कार ईकॉमर्स प्लॅटफॉर्म Cars24, प्रोटीन फूड स्टार्टअप शाका हॅरी आणि ड्रोन सर्व्हिसेस स्टार्टअप गरुडा एरोस्पेस यांचा समावेश आहे. त्याचा स्वत:चा फिटनेस आणि लाइफस्टाइल कपड्यांचा ब्रँड सेव्हनही आहे.

त्याचा स्वत:चा फिटनेस आणि लाइफस्टाइल कपड्यांचा ब्रँड सेव्हनही आहे. तो फुटबॉल संघ चेन्नईयन एफसी, माही रेसिंग टीम इंडिया आणि फील्ड हॉकी संघ रांची रेजचा सह-मालक आहे. कर्णधार लिमिटेडचे संचालक सिद्धार्थ बन्सल म्हणाले, “धोनी हा केवळ क्रिकेटचा आयकॉन नाही, तर तो विश्वास आणि विश्वासार्हतेचेही प्रतीक आहे.”

[ad_2]

Related posts