Shubman Gill Has Started The Batting Practice Shubman Gill IND Vs PAK World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shubman Gill IND vs PAK World Cup 2023 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill Health update ) याने सरावाला सुरुवात केली आहे. शुभमन गिल  बुधवारी अहमदाबादमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने आज सरावाला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील (IND vs AUS) सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. भारतीय संघ (Team india) दिल्लीवरुन अहमदाबादमध्ये आज दाखल होणार आहे. दिल्लीमध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानविरोधात दोन हात करत होता, तेव्हा शुभमन गिल डेंग्यूचा सामना करत होता.

मिळालेल्या वृत्तानुसार, शुभमन गिल याची प्रकृती (Shubman Gill Health update ) सुधारली आहे. चेन्नईतून अहमदाबादला दाखल झाल्यानंतर गिल याने सरावाला सुरुवात केली आहे. शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. त्यासाठी गिल याने तयारी सुरुवात केली आहे.  बीसीसीआयची मेडिकल टीम (BCCI medical team) शुभमन गिल याच्यावर लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानावत उतरणार का? याकडे सर्वच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. वर्षभरापासून शुभमन गिल भन्नाट फॉर्मात आहे. गिलची अनुपस्थिती भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरोधात प्रकर्षाने जाणवली, त्यामुळे गिलच्या कमबॅककडे सर्वच क्रीडा प्रेमी नजरा लावून बसले आहेत. 

भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल याला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधात तो मैदानात उतरु शकला नाही. गिलच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली होती. पण पहिल्याच सामन्यात ईशान किशन शुन्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात ईशान किशन याने 47 धावांची खेळी केली. शुभमन गिल याने मागील वर्षभरात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. फॉर्मात असणारा गिल संघात नसल्याची कमी भारतीय संघाला जाणवत आहे. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल टीम इंडियात कमबॅक करण्याची संधी आहे.  

 

मागील वर्षभराची आकडेवारी पाहिल्यास शुभमन हा टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. गिलने आतापर्यंत खेळलेल्या 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1917 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. गिलचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम स्कोअर 208 धावा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमनने चमकदार कामगिरी केली होती. इंदूर वनडेत त्याने शतक झळकावले. याआधी त्याने मोहालीत 74 धावांची इनिंग खेळली होती. पाकिस्तानविरोधात मैदानात परतल्यास भारतासाठी तो मोठा प्लस पॉइंट असेल.



[ad_2]

Related posts