ODI World Cup 2023 India Playing Against Pakistan Head To Head Ind Vs Pak

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK, World Cup 2023 : विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहे. विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघ अजेय आहेत.दोन्ही संघाने दोन दोन विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. या दोन्ही संघाचा सामना म्हटले की क्रिकेट रसिकांना मोठी पर्वणीच होय. 

शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ भिडणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील या विश्वचषक सामन्यावर केवळ भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेच नाही तर जगभरातील चाहत्यांची नजर आहे. अशा परिस्थितीत या दोघांची काही रंजक आकडेवारी पाहूयात..भारत आणि पाकिस्तान यांच्यात किती सामने खेळले गेले आणि किती सामन्यांमध्ये कोण जिंकले? याची माहिती जाणून घेऊयात.. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंजक आकडेवारी –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 134 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने 56 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. म्हणजे, एकदिवसीय सामन्यांचा इतिहास पाहता पाकिस्तानचे पारडे जड दिसत आहे. मागील दोन दशकांपासून भारताचे पारडे जड आहे. 

 एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्याचा निकाल लागला नाही. आजपर्यंत एकही सामना बरोबरीत सुटलेला नाही.

भारताने आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानचा 11 सामन्यात पराभव केला आहे.  तर पाकिस्तान संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर 14 वेळा भारताचा पराभव केला आहे.

भारतने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा 11 वेळा पराभव केला आहे. तर पाकिस्तान संघाने भारताचा भारतीय मैदानावर 19 वेळा पराभव केला आहे.  

न्यूट्रल ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जास्त सामने झाले आहेत.  त्रयस्त ठिकाणी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 34 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान संघाने 40 वेळा बाजी मारली आहे.  

विश्वचचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत सात वेळा सामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघाला आतापर्यंत एकदाही भारतीय संघावर विजय मिळवता आला नाही. 

ओव्हरऑल वनडे सामन्यात पाकिस्तान संघ भारतापेक्षा जास्त वरचढ दिसत आहे. पण विश्वचषक सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. आता 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

[ad_2]

Related posts