Special Train For IND Vs PAK World Cup 2023 Western Railway Announced Special Train Between Mumbai To Ahmedabad For Ind Vs Pak Match Know All Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Special Train For IND vs PAK World Cup 2023: क्रिकेट विश्वचषकातील (World Cup 2023) टीम इंडिया (Team India) -पाकिस्तान (Pakistan) सामना बघण्यासाठी अहमदाबादला (Ahmedabad) जाण्यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन (Spacial Trains) चालवण्याची घोषणा केली. मात्र, काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या 17 मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं दुसऱ्या स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन आज रात्री 11.20 वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विश्वचषक स्पेशल ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना विशेष सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी विशेष ट्रेनमुळे टीम इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या अतिरिक्त गर्दीला सामावून घेता येईल. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी परतेल. यासाठी रेल्वेनं तिकीट दरही निश्चित केले आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 09013/09014 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल दरम्यान धावेल. ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल येथून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09014 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन येथे थांबेल. 

14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तानात महामुकाबला 

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे, तर अहमदाबाद मेट्रो देखील सामन्याच्या दिवशी पहाटे 1 वाजता सुटेल. पाकिस्तानचा संघ 11 वर्षांनंतर अहमदाबादमध्ये सामना खेळणार आहे. या सामन्याला एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Related posts