After Raj Thackeray Shock Shinde Fadnavis Government Got A Rude Awakening 10 Big Announcements About Tolls

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : टोलचा मुद्द्यावरून सातत्याने महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray on Toll) यांनी टोलच्या झोलची पोलखोड केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंत्री दादा भुसेंसोबत (Dada Bhuse) संयुक्त पत्रकार परिषद करत टोल संदर्भातील कोणते बदल होणार आहेत याची सविस्तर माहिती दिली. यानुसार आता दिवसभरातटोल किती वसूल झाला किती बाकी आहे याची माहिती आता प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचबरोबर मनसेकडून जुने टोल बंद करण्यासंदर्भातील मागणी राज्य सरकारकडे आणण्यात आली आहे. पीडब्ल्यूडीचे 29 आणि एमएसआरडीसीचे 15 जुने टोल बंद करा, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संदर्भात विचार करून निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. पुढील15 दिवसात मुंबईत सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावले जातील. राज ठाकरेंकडून टोल बंद करण्यात संदर्भात मागणी करण्यात आली आहे, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला आहे. राज ठाकरेंकडून जुने टोल बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

(Raj Thackeray on Toll) टोलसंदर्भातील 10 मोठ्या घोषणा 

  • टोल किती वसूल झाले याची माहिती दोन्ही बाजूने दिली जाणार
  • दिवसभरात किती जमा झाली याची माहिती सुद्धा मिळणार
  • आनंद नगर ते ऐरोली यादरम्यानचा टोल एकदाच भरावा लागणार तो दोनदा भरण्याची आवश्यकता नाही, एक महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी होणार
  • जुने टोल बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार
  • पुढील15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील.  किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल.
  • व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल
  • रुग्णवाहिका, स्वच्छतागृह , सीसीटीव्ही कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होताय ते कळेल
  • करारामधील नमूद उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईकडून केलं जाणार 
  •  5 रुपये वाढीव टोल बाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा,  त्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल
  • टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची सोय असावी 
  • टोल कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे 
  • रस्ते खराब असल्यास टोल भरला जाणार नाही 
  • टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांसाठी पास मिळावा 
  • पिवळ्या रेषेमागे चार मिनिट वाहन थांबल्यास टोल भरला जाणार नाही 
  • वांद्रे सीलिंक, एक्स्प्रेस वे टोलची कॅगकडून चौकशी 
  • वाढीव टोल रद्द करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत 
  • मुंबई एन्ट्री पाँईंटवर मनसे स्वच्छतागृह उभारले जाणार 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts