This Festive Season Will Be A Business Of RS 4 Lakh Every Second See Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Festive Season : सध्या सणांचा हंगाम सुरु झाला आहे. यावर्षीचा सणाचा हंगाम रक्षाबंधनाने सुरू झाला आहे. हा सणांचा उत्साह 23 नोव्हेंबर म्हणजे तुळशी विवाह दिवसापर्यंत सुरू राहणार आहे. या काळात नवरात्री, दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, छठपूजा आणि शेवटी तुळशीविवाह असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत. दरम्यान, या सणांच्या काळात प्रत्येक सेकंदाला ‘चार’ लाखांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत आणि खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या संकटानंतर हे असे वर्ष आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची भीती नाही. या कारणामुळं चालू सणासुदीच्या 85 दिवसांमध्ये प्रत्येक सेकंदाला 4 लाख रुपयांचा म्हणजेच एकूण 3 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला जाऊ शकतो. गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात 2.50 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. 

सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी सांगितले की, यावर्षी सणांचा हंगाम रक्षाबंधनाने सुरु झाला आहे. हा सणांचा उत्साह 23 नोव्हेंबर म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवसापर्यंत सुरु राहील. या काळात नवरात्री, दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, भाईदूज, छठपूजा आणि शेवटी तुळशीविवाह असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातील. भारतीय ग्राहक या सणासुदीच्या हंगामात अंदाजे 3 लाख कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवली आहे. 

दर सेकंदाला चार लाख रुपयांचा व्यवहार 

कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, देशात मेनलाइन रिटेल व्यवसायासाठी अंदाजे 60 कोटी ग्राहक आहेत. जर प्रत्येक ग्राहकाने 5000 रुपये खर्च केले तर व्यवसाय आपोआप 3 लाख कोटी रुपयांचा होईल. हा व्यवसाय दर तासाला 147 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. दर मिनिटाला 2.45 कोटी रुपयांहून अधिक आणि प्रत्येक सेकंदाला 4 लाख रुपयांहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज आहे.

हे सर्व खरेदी केले जाईल

CAT च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलं आहे. त्यामुळं लोक यावर्षी सण-उत्सव आनंदाने आणि समृद्धीने साजरा करतील. या सणांच्या काळात लोक घरगुती वस्तू, उपकरणे, भेटवस्तू, कपडे, दागिने, नकली दागिने, भांडी, सजावटीच्या वस्तू, फर्निचर आणि फिक्स्चर, किचनवेअर, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल वस्तू, मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी करतील. या खर्च वस्तूंवर लोक मोठा खर्च करण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

भारत-पाकिस्तानचा व्यापार किती? प्रत्येक भारतीयांच्या घरात ‘या’ आहेत पाकिस्तानी वस्तू

[ad_2]

Related posts