Icc World Cup Points Table Before India Vs Pakistn Odi World Cup 2023 Standings Latest Net Run Rate Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC ODI World Cup 2023 Points Table : भारतात होत असलेल्या विश्वचषकामध्ये (World Cup 2023) आज टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात झाली. सलामी सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पाहायला मिळाला. विश्वचषक 2023 मध्ये 10 संघांमध्ये लढत आहे. 10 संघ रॉबिन ग्रुप स्टेज फॉरमॅटमध्ये एकदा एकमेकांच्या आमने-सामने येतील. 45 गट टप्प्यातील सामन्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहे. विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळवण्यात आले आहेत. आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी वर्ल्ड कपचा पॉईंट्स टेबल (World Cup 2023 Points Table) ची स्थिती जाणून घ्या.

विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल

विश्वचषकात न्यूझीलंड संघ विजयी कामगिरीसह पाईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर आठ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा 134 धावांनी पराभव केला. त्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. टीम इंडियाने आतापर्यंतचे दोन सामने जिंकले आहेत.

पाईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंतचे दोन सामने जिंकले आहेत. पाईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.604 आहे. तर दक्षिणत आफ्रिकेचा नेट रनरेट +2.360 आहे. भारताचा नेट रनरेट +1.500 आणि पाकिस्तानचा नेट रनरेट +0.927 आहे.

भारत आणि पाकिस्तान संघात टक्कर

भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झालं असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. दुपारी 1.30 वाजता नाणेफेक होईल. विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. या सर्व 7 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts