Farmer From Bhor Pune After The Death Of The Cow In The Family Gave Food To Villagers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोर, पुणे : शेतकरी आणि त्यांच्या घरात असलेल्या गाई, बैल आणि म्हशींशी वेगळं नातं असतं. हे सगळे प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात. याचपैकी एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबियांवर होतो. घरातील खिलार जातीच्या आणि सर्वांच्या लाडक्या गायीचा मृत्यू झाला आणि याच गायीचा दहावं करत कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यातील भोर परिसरातील शेतकरी शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांनी घरातल्या व्यक्तीप्रमाणे दहाव्याचा कार्यक्रम करत संपूर्ण गावाला पुरणाचं जेवण दिलं. त्यांच्या या कामामुळे गावात त्यांचंं कौतुक होत आहे. 

बाजारवाडी (ता.भोर) येथील प्रगतीशील शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांच्या घरातील गाईचा खिलार जातीची राधा गाय होती. राधा गायीने घराचं नंदनवन केले. पोळ यांनी गायीची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या गायीचा शेवट गोड केला. वासरु ते 20 वर्षांचा सहवासात राधा गायी ही पोळ कुटुंबाची सदस्य बनली. काही दिवसांपूर्वीच तिनं वासराला जन्म दिला होता. घरातील लहान थोरांची आवडती असणारी राधा हिचा मृत्यू झाला. तिचा घरातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून तिचा दहाव्याचा विधी थाटात करण्यात आला. गायीचे आणि शेतकऱ्याचं अतुट नातं असतं शेतकरी आपल्या गायीना जीवापाड जपतात. प्रेम करतात .घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात, शेतकरी हा आपल्या गायीच्या भरवशावर प्रपंचाचा गाडा हाकतात. घरातल्या गायीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही, असं पोळ सांगतात.

मुलीप्रमाणे सांभाळलं अन्…

राधा या लाडक्या गायीचा माणसांप्रमाणे दहाव्याचा विधी केला. 10 वर्षे मुलीप्रमाणे संभाळलेल्या राधा गायीचा  मृत्यू झाला होता.ज्या प्रमाणे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे राधा गायीच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला. 

गावजेवण अन् विधीवत पुजा…

विधिवत पूजा करून,राधा गायीचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून 21 गायींना पुरणपोळी देण्यात आली. तसेच खिलार जातीची गायी ज्यांच्याकडे आहे अशा 21 शेतकऱ्यांना फड्या ,रतीबाचे भांडे भेट देत टाॅवेल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दहाव्याला संपूर्ण गावाला पुरणपोळीचे गाव जेवण देण्यात आलं. जेवणांनानंतर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. दहाव्याच्या विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते. परिसरात सध्या शेतकरी धनंजय पोळआणि त्यांच्या राधा गायीच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

इतर महत्वाची बातमी-

Manipur Violence : मणिपूर हत्याकांड प्रकरण: सीबीआयने पुण्यातून मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

[ad_2]

Related posts