[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : समृध्दी महामार्गावर (Samriddhi Highway) मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरजवळ टेम्पोच्या आणि ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून, जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पो अपघाताबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 15, 2023
पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या वारसांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देखील ट्वीट करत छत्रपती संभाजीनगरच्या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. तर अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Pained by the loss of lives due to an accident in Chhatrapati Sambhajinagar district. My thoughts are with those who lost their loved ones. I wish the injured a speedy recovery. An ex-grata of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured…
— PMO India (@PMOIndia) October 15, 2023
उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2023
संबंधित बातम्या:
Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातात 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी; अपघातातील जखमी आणि मृतांची यादी
[ad_2]