Maharashtra Disputes Between Sudhir Mungantiwar And MLA Bacchu Kadu From Shivaji Maharaj Wagh Nakhe Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ‘इंग्रजांनी लुटलेले पैसेही परत आणा’, असा मिश्किल टोला आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवारांना (sudhir mungantiwar) लगावला आहे. तर यावर मुनगंटीवारांनी देखील बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नव्हती असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. 

राज्य सरकारचे लंडनमधील म्युझियमशी करार केला आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः लंडनमध्ये गेले होते. आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारला जमलं नसलेलं काम हे या सरकारने केलं आहे, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण आहे. ही वाघनखं महाराष्ट्रात 16 नोव्हेंबर रोजी आणण्यात येणार आहेत. 

बच्चू कडू काय म्हणाले?

वाघनखांवरुन राजकारण चांगलचं पेटल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारने वाघनखं लंडनमधून परत आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर मोठी चर्चा सुरू झाली. ती वाघनखं नेमकी शिवरायांनी वापरलेली होती की शिवकालीन आहेत याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. तर यामध्ये आता आमदार बच्चू कडू यांनी देखील मिश्किल टीका केल्याचं पाहायला मिळालं बच्चू कडू म्हणाले की, जे काम साध्या फोनवरुन झालं त्यासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च करण्याची काय गरज होती. शेवटी त्यांनी त्यांच्यासोबत वाघनखं आणलीच नाहीत. मोदीजी डीजीटल इंडिया म्हणतात. पण तरीही आमचे मंत्री फिजीकल जातात आणि रिकाम्या हाती परत येतात. जर आम्हाला सोबत नेलं असतं तर आम्ही ती वाघनखं लुटूनच माघारी आणली असती. 

बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाही – मुनगंटीवार

दरम्यान बच्चू कडूंच्या या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं की, बच्चू कडूंकडून आम्हाला ही अपेक्षा नाही. शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या वाघनखांविषयी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यांना लाखो रुपयांचा पगार हा जनतेसोबत केलेल्या करारमधून मिळतो, त्याविषयी आम्ही बोललो तर. कोणताही करार हा ऑनलाइन होत नसतो. अधिवेशनावर देखील कोटी रुपये खर्च होतात, पुढे ते बोलतील अधिवेशन देखील घेऊ नका. 

लंडनमधील ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखं आणण्यात येणार आहेत त्या संग्रहालयाने करार करताना काही अटी समोर ठेवल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे, 

– ही वाघनखं कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत.
– या वाघनखांचे इन्शुरन्स काढण्यात यावं. जेणेकरून त्याची चोरी होऊ नये.
– या वाघनखांच्या सुरक्षेसंबंधित काय उपाययोजना करण्यात येणार आहे त्या सांगाव्यात. त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी.

हेही वाचा : 

Wagh Nakh : महाराष्ट्राला वाघनखांची प्रतीक्षा अन् स्वागताची सुरूवात लंडनमधून, साऊथ हॉलच्या दारी झळकलं पोस्टर

[ad_2]

Related posts