Los Angeles Olympics Organisers On King Kohli IOC Session Approves S Proposal For Additional Sports

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cricket Return In Olympics : क्रिकेट पुन्हा एकदा तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये (Cricket Return In Olympics) परतणार आहे. अमेरिकेत 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. याशिवाय स्क्वॅशही 2028 च्या ऑलिम्पिक खेळाचा भाग असेल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (International Olympic Committee) बैठकीत क्रिकेट आणि स्क्वॅशला 2028 साठी ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. क्रिकेट आणि स्क्वॉशसह एकूण 5 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. 

बोर्डाच्या शिफारशींवर आयओसी सदस्यांनी आज मतदान करत क्रिकेटसह पाच खेळांच्या समावेशावर शिक्कामोर्तब केले. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा यापूर्वीचा एकमेव सहभाग पॅरिस 1900 मध्ये होता, जेव्हा ग्रेट ब्रिटनने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव केला होता. नेदरलँड आणि बेल्जियमने माघार घेतल्यानंतरही हा एकमेव सामना होता.

क्रिकेटच्या समावेश करताना कोहलीचा विराट गौरव 

लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आयोजकांनी किंग कोहलीचा गौरव करताना म्टटले आहे की, विराट कोहलीचे 340 मिलिअन सोशल मीडिया फाॅलोअर्स आहेत. त्यामुळे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक फाॅलो केला जाणारा खेळाडू आहे. कोहलीचा सोशल मीडियातील फाॅलोअर्सचा आकडा हा ली ब्रोन, टाॅम ब्रॅडी आणि वुडसचा मिळूनही होत नाही.

तत्पूर्वी, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत सुतोवाच सुरु करण्यात आल्यानंतर कोहलीच्या फोटोचा वापर करत माहिती दिली होती. त्यामुळेआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष  थॉमस बाक यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉस एंजेलिस आयोजन समितीने पाच नवीन खेळ सादर करण्याचा प्रस्ताव आयओसी कार्यकारी मंडळाने पॅकेज म्हणून स्वीकारला आहे. बेसबॉल आणि सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, स्क्वॅश आणि क्रिकेट या पाच खेळांचा समावेश आहे.

अलीकडेच चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने विजयी झेंडा फडकवत सुवर्णपदक पटकावले. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने होती. पुरुष आणि महिला दोन्ही भारतीय संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीतून सुरुवात केली. पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. यानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा तर अंतिम फेरीत अफगाणिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा 8 गडी राखून तर अंतिम फेरीत श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत पदक जिंकले.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts