World Cup 2023 Virender Sehwag Gave Reality Check To Former England Captain Michael Vaughan On Semifinal

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virender Sehwag’s Reply Check : दिल्लीमध्ये इंग्लंडला पराभवाचा मोठा धक्का बसला. अफगाणिस्तान संघाने साहेबांना हरवत विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तानने रविवारी गतविजेत्या इंग्लंडला 69 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मोठा दावा केला. त्याला वीरेंद्र सहवाग याने दिलेले उत्तर चर्चेत आहे. इंग्लंडचा संघ 2023 मध्ये सेमीफायनलमध्ये जाणार, असे ट्विट मायकल वॉन याने केले होते. हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. वीरेंद्र सहवाग आणि वसीम जाफर यांनी मायकल वॉनच्या ट्वीटचा समाचार घेतला. 

सहवागने काय दिले उत्तर ?

2023 विश्वचषकात इंग्लंड सेमीफायनलमध्ये जाणार… असे ट्वीट मायकल वॉन याने केले होते. त्या ट्वीटला सहवागने आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. सहवागने ट्वीटमध्ये आतापर्यंतची आकडेवारीच दिली. त्याने म्हटले की, “1996, 1999, 2003, 2007, 2011, 2015 आणि 2023 मध्ये नाही. 8 प्रयत्नात फक्त एकदा” इतकेच नाही तर इंग्लंडच्या पराभवानंतर वीरेंद्र सहवागने आपल्या ट्वीटवर लिहिले होते की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे वाटतेय. 

इंग्लंडच्या पराभवानंतर भारताचा माजी सलामी फलंदाज वसीम जाफर यानेही मायकल वॉन याची खिल्ली उडवली होती. वसीम जाफर याने एक मिम्स शेअर केले होते. मायकल वॉन तुम्ही ठीक असाल, अशी आशा आहे, असे मिम्सवर लिहिले होते.  

सामन्यात काय झालं ?

विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी रविवारी अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत झाला. फारुकी आणि नावीन  हकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही. अफगाणिस्तानचा डाव शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संपला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. 



[ad_2]

Related posts