Ajinkya Rahane Scored 76 With 6 Fours And 3 Sixes In The Syed Mushtaq Ali Trophy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने झंझावती अर्धशतकी खेळी करत मुंबईला सहज विजय मिळवून दिला. हरियाणाने दिलेले 148 धावांचे आव्हान मुंबईने आठ विकेट शिल्लक ठेवून सहज पार केले. अजिंक्य रहाणे याने कर्णधाराला साजेशी अर्धशतकी खेळी केली. रहाणेच्या खेळीचं सध्या कौतुक होत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे याने वादळी खेळी केली. 

अजिंक्यचं वादळी अर्धशतक – 

अजिंक्य रहाणे याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली आहे. अजिंक्य रहाणे याने 43 धावांत वादळी 76 धावांची खेळी केली. या खेळीत रहाणे याने सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. कठीण परिस्थितीत अजिंक्य रहाणे याने शतकी खेळी केली. 

मुंबईची सुरुवात खराब, पण रहाणेनं डाव सावरला –

हरियाणाने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. युवा सलामी फलंदाज फक्त 12 धावा काढून तंबूत परतला. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. अजिंक्य रहाणे याने रघुवंशी याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. रघुवंशी याने 24 चेंडत 26 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. रघुवंशी बाद झाल्यानंतर शिवम दुबे याला साथीला घेत मुंबईला विजय मिळवून दिला. अजिंक्य राहणे आणि शिवम दुबे यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. शिवम दुबे याने 20 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली.

युजवेंद्र चहल ठरला महागडा –

हरियाणाच्या गोलंदाजांना भेदक मारा करण्यात अपयश आले.अंशुल कंभोज याने यशस्वीला बाद करत दणक्यात सुरुवात केली. पण त्यानंतर मुंबईवर दबाव निर्माण करण्यात अपयश आले. मोहित शर्मा,विशांत सिंधू, हर्षल पटेल, अमित मिश्रा, जयंत यादव यांनाही एकही विकेट घेता आली नाही. युजवेंद्र चहल याची फिरकीही फेल केली. युजवेंद्र चहल याने 3 षटकात 30 धावा खर्च करत एक विकेट घेतली. 

हरियाणाची 147 धावांपर्यंत मजल – 

हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेटच्या मोबदल्यात 18 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली होती. हर्षल पटेल याने 38 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्याशिवाय अंकित कुमार याने 36 धावांचे योगदान दिले. निशांत सिंधू याने 30 धावांची खेळी केली. राहुल तेवातिया याने अखेरीस 10 चेंडूत 18 धावा केल्या. मुंबईकडून तनुश कोटीन याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, सॅम मुलानी यांना एकही विकेट मिळाली नाही. मोहित अवस्थी याने दोन विकेट घेतल्या.



[ad_2]

Related posts