… अन् बड्या कंपनीचा CEO कपडे काढून मीटिंगला बसला; Photo Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Office Meetings : म्हटलं की अनेकदा आपल्यावर इतकं दडपण येतं की विचारून सोय नाही. मुळात हे दडपण प्रत्येक वेळी नवं असतं. पण, ओघाओघानं अनुभव येत जातो तसतसं हे दडपणही कमी होत जातं. पण, ते अती कमी होणंही धोक्याचं. नाहीतर काय होतं? नको नको ते ऐकावं लागतं, नाचक्की होते, चारचौघात वावरतानाही अडचणी येतात. 

ऑफिस, मिटींग, नाचक्की हे उल्लेख होण्यामागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला फोटो. एअर एशियाचे सीईओ (AirAsia CEO Tony Fernandes ) टोनी फर्नांडिसनं ऑफिस मिटिंगला हजेरी लावली आणि या क्षणांचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले. 

‘काय तणावपूर्ण आठवडा होता…’ असं म्हणत त्यानं मिटींगमधील फोटोला कॅप्शन दिलं. पुढे आपल्याला एका सहकाऱ्याकडून मसाज करून घेण्याचा सल्ला मिळाला आणि आता तर आपण इंडोनेशिया आणि एअर एशियाच्याच प्रेमात पडतोय कारण मला मॅनेजमेंट मिटींगमध्येही मसाज घेता येतोय, असंही त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं. फर्नांडिसनं मिटिंगला हजेरी लावली, पण इथं ते कपडे काढून बसले होते. त्याचं हे Shirtless होत मिटिंगला बसणं अनेकांना रुचलं नाही. 

अनेकांनीच सुनावलं…

तिथं फर्नांडिसनं एअर एशियाचं कौतुक केलेलं असतानाच इथं मॅनेजमेंट मिटिंगमध्ये त्यांनी मिटिंगमध्ये कपडे काढून बसायला परवानगी दिल्यामुळं अनेकांनीच एअर एशियावर ताशेरे ओढले. काहींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत ही कृती unprofessional असल्याचं म्हणत त्यांच्या वर्तणुकीवर निशाणा साधला. 

फर्नांडिसनं LinkedIn वरून त्याचा मिटिंगमधील फोटो शेअर करताच त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या. त्यानं काही कमेंट्स डिलीट केल्याबद्दलही अनेकांनीच त्याला फटकारलं. 

‘आम्हाला वाटत नाही की तुमच्या संस्थेमध्ये महिला सहजपणे काम कत असतील, त्या बहुधा तुम्हाला आव्हानच देत नसतील किंवा काहीच बोलत नसतील. किमान त्या डिलीट केलेल्या कमेंट वाचल्या असतात’, अशी कमेंट एकानं केली. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाची तुम्ही काळजी करता याचं कौतुक, पण कर्मचाऱ्यांप्रती सहानुभूतीपूर्ण वागण्याची ही काही पद्धतच नाही, अशीची कमेंट अनेकांनी केली. 

trending news AirAsia CEO receives conduct shirtless meeting

एक चुकीची कृती करून त्या कृतीचा गाजावाजा करणाऱ्या फर्नांडिसला काहींनी तर असं फटकारलं की तो या जन्मात तरी ते विसरणार नाही. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या मर्यादा सोडून वागल्यामुळं त्यानं अनेकांचाच रोष ओढावला. आता यावर तो नेमकं काय स्पष्टीकरण देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Related posts