Israel Hamas War Types Of Jews Know Which Jews Live Where In India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Israel: भारत (India) हा एक देश आहे ज्यामध्ये सर्व धर्मीय लोक एकजुटीने राहतात. या हिंदू बहुल देशात धार्मिक कारणावरुन क्वचितच कोणाशी भेदभाव केला गेला आहे, म्हणूनच या देशात शतकानुशतकं विविध धर्मांना समान स्थान दिलं जातं. ज्यू समुदायाच्या लोकांना जगभर द्वेषाचा सामना करावा लागत असताना, त्यांना भारतात कधीही कोणत्या प्रकारची समस्या आली नाही.

आज जर भारतातील ज्यूंची (Jews) लोकसंख्या पाहिली तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे सर्व ठिकाणी तुम्हाला ज्यू आढळतील. पण, तुम्हाला भारतातील एक ज्यू समुदाय थोडा विभक्त आढळेल. आज भारतात राहणाऱ्या ज्यूंबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.

भारतात किती प्रकारचे ज्यू राहतात?

भारतातील ज्यू समुदाय प्रामुख्याने तीन भागात विभागलेला आहे. पश्चिम भारतातील बेने इस्रायली ज्यू प्रथम वर्गात येतात. पश्चिम बंगालचे बगदादी ज्यू दुसऱ्या क्रमांकावर आणि केरळचे कोचीन ज्यू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय ईशान्य भारतातील बेने मेनाशे ज्यू आणि आंध्र प्रदेशातील बेने एफ्राइम ज्यू देखील येथे राहतात.

बेने एफ्राइम ज्यू स्वतःला तेलुगु ज्यू म्हणतात, कारण ते तेलुगू भाषा बोलतात. तर, भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये म्हणजे मणिपूर आणि मिझोराममध्ये राहणारे बनी मेनाशे ज्यू समुदायाचे लोक मानतात की, त्यांचे पूर्वज इस्रायलचे आहेत. म्हणजेच बघितलं तर हा समाज भारतात 5 भागात विभागलेला आहे.

भारतातील ज्यूंचा इतिहास

असे मानले जातं की, ज्यू 2000 वर्षांपूर्वी भारतात आले. केरळच्या मलबार किनार्‍यावरून त्यांनी प्रथम भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं, त्यानंतर ते हळूहळू भारताच्या प्रत्येक भागात पोहोचले. जर्मन न्यूज वेबसाइट DW च्या रिपोर्टनुसार, 1940 च्या दशकात भारतात ज्यूंची लोकसंख्या सुमारे 50 हजार होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्यू लोक भारतीय सैन्यात देखील होते. 1924 मध्ये जन्मलेल्या J.F.R. जेकबने भारतीय सैन्यात भरती होऊन आपल्या देशाची सेवा केली आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतात ज्यूंची धार्मिक स्थळंही

खबाद हाऊस (Khabad House) ज्यूंसाठी खूप खास आहे, तुम्हाला बहुतेक देशांमध्ये हे आढळेल. खबाद हाऊसमध्ये ज्यू लोक प्रार्थना करतात. भारतातही हे खबाद हाऊस आढळतात. दिल्लीतील पहाडगंज, अजमेर, हिमाचलचं धरमकोट, राजस्थानचं पुष्कर आणि मुंबईतही ज्यू धर्मीयांचे खबाद हाऊस बांधण्यात आले आहेत. भारतभेटीसाठी येणारे इस्रायली येथे प्रार्थना करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दरवर्षी इस्रायलमधील हजारो पर्यटक हिमाचल प्रदेशातील धरमकोट, धर्मशाला येथील खबाद हाऊसला भेट देण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येतात.

हेही वाचा:

Facts: हिंदू धर्मापेक्षा किती वेगळा आहे ज्यू धर्म? ‘अशा’ प्रकारे करतात पूजा

[ad_2]

Related posts