वाढत्या प्रदूषणामुळे मास्क वापरण्याचे पालिकेचे आवाहन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई आणि परिसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट झाली आहे, अशी परिस्थिती आहे. हे पाहता बीएमसीने आता लोकांना बाहेर पडताना सुरक्षिततेसाठी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुलाबा ते सांताक्रूझ आणि उपनगरी भागात प्रदूषण वाढले आहे. ऑक्‍टोबरचा उष्मा जसजसा वाढत जातो, तसतशी खालावत चाललेली हवेची गुणवत्ताही नागरिकांसमोर समस्या निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.

सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, आता मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही वाईट झाली असून, पालिकेने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

केवळ मुंबईच नाही तर ठाणे आणि नवी मुंबईची हवाही खराब झाली आहे. संपूर्ण मुंबई शहर सध्या श्वास घेण्याच्या समस्येने हैराण झाले आहे.

धुळीचे कण आणि हवेत धुके जमल्याने मुंबईत धुके पसरले आहे. मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांसाठी मास्क अनिवार्य नसले तरी मास्क वापरताना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा

मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, जाणून घ्या कधी धावणार मेट्रो

मुंबईच्या राणीबाग प्राणीसंग्रहालयात इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस धावणार

[ad_2]

Related posts