Ahmednagar Maharashtra Loksabha Election Nilesh Lanke Ram Shinde Will Be In A Race With Sujay Vikhe Patil For MP Election Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूकीचे (Loksabha Election) वारे आतापासूनच वाहायला सुरुवात झाली आहे.  भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या विरोधामध्ये कधी आमदार शंकरराव गडाख तर कधी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) तर कधीही त्यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असते.  त्यातच आणखी एका नावाची भर आता पडल्याचं म्हटलं जातय.  ते नाव म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचे.  

सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या बॅनरवर आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचे फोटो झळकायला सुरुवात झालीये.  त्यातल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यात त्यांचे बॅनर्स झळकू लागले आहेत.  त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत राणीताई लंके या उभ्या राहू शकतील अशा जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. 

राणीताई लंकेच्या नावाचे बॅनर 

सध्या नवरात्र सुरु असल्यामुळे अहमदनगरच्या  पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवीकडे जाणाऱ्या महिला भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी अनेक नेत्यांचे बॅनर या रस्त्यांच्या कडेला लागले आहेत.  त्यातच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचा फोटो असलेला बॅनर देखील पाहायला मिळाला. 

त्यातच राणीताई लंके यांचे पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी या तालुक्यांमध्ये दौरे वाढल्याचं सांगण्यात येतय. त्यामुळे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके या खासदार सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आलंय. मात्र सध्या हे प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये एकत्र आहेत तरी देखील आमदार निलेश लंके यांचे एक वक्तव्य भविष्यातील राणीताई लंके यांच्या उमेदवारीला दुजोरा देणारच ठरत आहे.

एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात – निलेश लंके

काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी एक सूचक विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, एकाच घरात दोन वेगळे मतप्रवाह असू शकतात.  दरम्यान सध्या भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणीताई लंके यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा रंगत असते. याबाबत बोलताना स्वतः राणीताई लंके यांनी हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत.  त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्याचा नक्कीच विचार होईल पण पक्षश्रेष्ठींचा विचार घेऊनच पुढे निर्णय घेऊ असं म्हटलं. 

खासदारीसाठी राम शिंदेही इच्छुक ?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना देखील बाहेरच्या उमेदवारांना ऐवजी दक्षिणेकडील एखाद्या नेत्याने उमेदवारी करावी अशी अपेक्षा आहे. कारण दक्षिण नगर जिल्हा हा अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि उत्तरेकडून येणारे नेते हे दक्षिणेकडील दुष्काळी भागात लक्ष घालत नाहीत असं कायमच म्हटलं जात. सुजय विखे यांच्या विरोधामध्ये कधी शंकरराव गडाख तर कधी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा होत असताना खुद्द त्यांच्याच पक्षातील विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे देखील खासदारकीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातं. . पक्ष आदेशानंतर निर्णय घेऊ असं सूचक विधान ते देखील नेहमी करत असतात. 

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदे यांचा विखे कुटुंबामुळेच पराभव झाला अशी चर्चा होती आणि याबाबत खुद्द राम शिंदे यांनी देखील पक्षश्रेष्टीकडे तक्रार केली होती. तेव्हापासूनच आमदार राम शिंदे आणि सुजय विखे यांचे फारसे सख्ख्य नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आमदार राम शिंदे हे अधून मधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं विधान करत असतात. 

जनता देईल तो निर्णय मान्य – सुजय विखे

आपल्याला कोणी बिनविरोध निवडणूक लढू देणार नाही कोणी ना कोणी समोरचा उमेदवार असणारच आहे. जनता जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे. आमदार निलेश लंके ज्यावेळी महाविकास आघाडी मध्ये होते त्यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे आणि त्यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला.  त्यातच आता आमदार निलेश लंके हे महायुतीत असल्याने खासदार सुजय काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं सूचक विधान केल्याने खासदार सुजय विखे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

BJP Rahul Gandhi : चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलं पंतप्रधान कोण हवंय? स्थानिक म्हणाले, राहुल गांधी!

[ad_2]

Related posts