Lalit Patil Drug Case Lalit Patil Driver Arrested By Sakinaka Police Mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील या प्रकरणात (Sasoon Hospital Drug Racket) आता नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ललित पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबई पोलिसांनी काल रात्री उशीरा अटक केली.  सचिन वाघ (वय30) असं या चालकाचं नाव आहे. याला साकीनाका पोलिसांनी अटक केली.

ललित पाटील यांना पुण्यातील रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ याने ललित पाटील यांना सतत मदत केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सचिन वाघ याला अटक करुन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत साकीनाका पोलिसांनी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ललित पाटीलचं ड्रग्ज रॅकेटचा विस्तार फार मोठा असल्याचं उघड झालं आहे. त्यात त्यांच्या भावाबरोबरच दोन महिलांचा समावेश असल्याचं पुढे आल्यानंतर त्या महिलांनादेखील काल अटक करण्यात आली होती. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या ललितला साथ देत असल्याचं तपासात उघड झालं होतं. त्यांना आता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

प्रज्ञा ही ललित पाटीलची प्रेयसी होती. ती ललित पाटीलचं ड्रग्ज रॅकेट चालवण्याचं प्लॅनिंग करत होती. दोघे पुण्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेटायचे. या सगळ्याचे आता खासगी फोटोदेखील एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. या फोटोतून ललित पाटील नावापुरताच तुरुंगात असल्याचं स्पष्ट होत आहे. कधी ललित पाटील मॉलमध्ये तर कधी आपल्या प्रेयसीजवळ दिसत आहे. त्यातच ललित पाटील जवळ दोन आयफोनदेखील होते. या आयफोनच्या माध्यमातून ललित पाटील आपल्या साथीदारांशी आणि प्रज्ञा कांबळेशी संपर्कात होता आणि महत्वाचं म्हणजे ससूनमध्ये त्याचा चांगला पाहुणचार सुरु असल्याचंदेखील या फोटोत दिसत आहे. ससूनमधील खिडकीत बसून तो सिगारेट ओढतानाचा देखील फोटो एबीपीच्या हाती लागले आहेत. बसल्या जागेवरुन ललित पाटीलने अनेकांना कामाला लावलं होतं तर अनेकांचा नशेच्या जाळ्यातदेखील ओढलं होतं. 

यापूर्वीही एका चालकाला अटक

7 ऑक्टोबरला ललित पाटीलला ससूनमधून पळून गेल्यानंतर रावेतपर्यंत सोडणाऱ्या चालकाला अटक केली होती.  गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. दत्ता डोके असं या गाडी चालकाचं नाव होतं. डोके हा ससूनमध्ये भरती असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. 

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil : ललित पाटीलसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा, संबंधित मंत्र्यांची चुप्पी; देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार

[ad_2]

Related posts