KL Rahul The Reaction Of Team India When Ravindra Jadeja Won The Best Fielder Medal

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने (IndvsBan) दमदार विजय मिळवला. विश्वचषकमध्ये (ICC Cricket World Cup 2023) भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बदल दिसून आला आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्यानंतर 11 खेळाडूंपैकी एका खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार दिला जातो. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांनीही उत्कृष्ट झेल घेतले. बीसीसीआयने व्हिडिओ शेअर करत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक (Best Fielder of the Match vs BAN) घोषित केला आहे.

बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. प्रशिक्षकांनी विशेषतः रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि केएल राहुल यांच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. केएल राहुल आणि जडेजाबाबत प्रशिक्षक दिलीप गोंधळलेले दिसले. या दोघांनीही उत्तम क्षेत्ररक्षण केल्यामुळे सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार कोणाला द्यायचा, याबाबत संभ्रम होता.

खेळाडूंना मोठे सरप्राईज मिळाले

संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप यांनी ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक कोणाला मिळणार याबाबत आश्चर्य व्यक्त केले. मैदानावर उपस्थित स्क्रीनवर या खेळाडूचा फोटो डिस्प्ले  झाला. ज्याला हे पदक मिळाले तो रवींद्र जडेजा होता. पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत असताना जडेजाने हवेत उडवत एक अप्रतिम झेल घेतला. केएल राहुलने विकेट कीपिंग करताना एका हाताने जबरदस्त झेलही घेतला, ज्याचे प्रशिक्षकांनी कौतुक केले. बीसीसीआयने पदक देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत चार सामने खेळले असून चारही सामने जिंकले आहेत. पण विशेष बाब म्हणजे या सर्व सामन्यांमध्ये संघातील वेगवेगळ्या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक मिळाले आहे. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर शार्दुल ठाकूरने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हे पदक मिळवले. त्याचवेळी केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध हे पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. चौथ्या सामन्यात रवींद्र जडेजाने पदक जिंकले.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts