Australia Vs Pakistan Live Match Update Pakistan Won The Toss & Decided To Bowl First Against Australia Babar Azam Imam Ul Haq

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळूर : विश्वचषक 2023 मध्ये आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी एक सामन्यात विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने तीनपैकी एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला आणखी संकटात न येण्यासाठी विजय अत्यावश्यक असेल. 

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या अंतिम संघात मोठा बदल झाला आहे. फिरकी अष्टपैलू शादाब खानच्या जागी लेगस्पिनर उसामा मीरला स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही चांगली कामगिरी करू. फलंदाजीत चांगली कामगिरी करायची आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्हालाही या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करायला आवडले असते. आम्ही श्रीलंकेविरुद्ध ज्या पद्धतीने खेळलो त्याची पुनरावृत्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 

बाबर आझम विरुद्ध ऑस्ट्रेलिया

दरम्यान, सध्याच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. यासह, विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत पाकिस्तानचे स्थान (4) ऑस्ट्रेलियापेक्षा (6) चांगले आहे. म्हणजेच सध्याच्या आकडेवारीवरून पाकिस्तानचा वरचष्मा आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक आकडा समोर आला आहे जो ऑस्ट्रेलियाची चिंता वाढवणार आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूप धावा केल्या. कांगारूंविरुद्ध या दोन्ही फलंदाजांची फलंदाजीची सरासरी 70 च्या आसपास आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात या दोन्ही खेळाडूंचा फलंदाजीच्या सरासरीनुसार टॉप-5 मध्ये समावेश आहे.

पाक-ऑस्ट्रेलिया सामन्यात सर्वाधिक शतके

पाकचा कर्णधार बाबर आझमने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 9 डावात 73.50 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 91.73 आहे. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान वनडे सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक शतके (3) झळकावणारा तो फलंदाज आहे.

पाकिस्तानविरुद्ध मजबूत फलंदाजीची सरासरी

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक विश्वचषक 2023 तिन्ही सामन्यांमध्ये फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. पण तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची फोडण्यात तरबेज आहे. इमामने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 7 सामन्यांच्या 7 डावात 69 च्या सरासरीने 414 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 87.71 राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने 2 शतके झळकावली आहेत.

विश्वचषकमध्ये दोघांची कामगिरी

बाबर आणि इमाम या विश्वचषकात आतापर्यंत फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीत. पाकिस्तानच्या पहिल्या दोन विश्वचषक सामन्यांमध्ये बाबर केवळ 5 आणि 10 धावा करून बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात त्याने 50 धावांची इनिंग नक्कीच खेळली. दुसरीकडे, इमामने या विश्वचषकात आतापर्यंत केवळ 15, 12 आणि 36 धावांची इनिंग खेळली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts