World Cup 2023 India And New Zealand Are Almost Set To Play In Semifinal While Pakistan Australia And England Not In Good Stage

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India and New Zealand : विश्वचषक 2023 स्पर्धा आता हळू हळू रंगात येतोय. अफगाणिस्तान आणि नेदरलँड यांनी बलाढ्य संघाचा पराभव करत मोठा उलटफेर केला. त्यामुळे विश्वचषक अधिकच रंजक झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. भारत आणि न्यूझीलंड संघाने सलग चार सामन्यात विजय मिळवलाय. दोन्ही संघाचे आठ आठ गुण आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या संघाची स्थिती नाजूक आहे. 

गुणतालिका पाहिल्यास सध्या न्यूझीलंड संघ आघाडीवर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.923 इतका आहे तर भारताचा नेट रनरेट +1.659 इतका आहे. दोन्ही संघ रविवारी भिडणार आहे. जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान होमार आहे.  गुणातिलेकत आघाडीच्या चार संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहेत. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक संघाला साखळी फेरीत कमीत कमीत सात सामन्यात विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंड आणि भारतालाही पुढील पाच सामन्यात तीन सामन्यात विजय मिळवावा लागले. भारताचे पुढील पाच सामन्यापैकी तीन सामने दुबळ्या संघाविरोधात आहेत. त्यामुळे भारताचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या तगड्या संघाचा पराभव केला आहे.  न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला आहे. 

विश्वचषकाचे दावेदार असणाऱ्या पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत.  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिाय यांनी तीन पैकी फक्त एक एक सामना जिंकला आहे. तिन्ही संघाचा नेटरनेट मायनसमध्ये आहे.  

भारत आणि न्यूझीलंडमध्ये थरार – 

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही स्पर्धेत आतापर्यंत अजय आहेत. पण आता याच दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी धर्मशालाच्या मैदानावर या दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. या सामन्यात एका संघाचा विजयरथ थांबणार आहे. रविवारी कोणता संघ बाजी मारतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा पराभव केला आहे. तर न्यूझीलंडने इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेश आणि अफगानिस्तान या संघाचा पराभव केला आहे.  
 

[ad_2]

Related posts