Nandurbar Latest News Maratha Community Will Be Given Lasting Reservation, Uday Samant Assured Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नंदुरबार : मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) संदर्भात राज्य सरकारकडून काम सुरू असून समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिलं जाईल, मात्र ते कधी याबाबत स्पष्ट भूमिका मंत्री उदय सामंत यांनी मांडली नाही. तसेच मराठा समाजातील तरुणांनी टोकाची पावलं उचलू नये, असे आवाहन सामंत (Udaya samant) यांनी यावेळेस मराठा समाजातील तरुणांना केले आहे.

नंदुरबार  (Nandurbar) जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गट (Udhhav Thackeray) आणि राज्यातील विरोधकांवर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली मात्र मराठा आरक्षणासंर्दभात मनोज जरांगे यांचं आंदोलन जोर धरू लागला आहे. अशातच एका मराठा आंदोलकाने आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी ऐरणीवर आला आहे. यावर सामंत म्हणाले की, राज्य सरकारकडून मराठा आरक्षण दिल जाणार आहे, मात्र ते कधी? या प्रश्नावर उदय सामंत यांनी बोलणं टाळलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून काम सुरू नुकतीच समितीची बैठक झाल्याचे ते म्हणाले. 

उदय सामंत ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावर म्हणाले की, ललित पाटील प्रकरणात विरोधकांकडून आरोप केले जातात. मात्र जोरात बोलून खोटं सत्य लपवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहे. त्यांच्याकडे विरोधकांना कायदेशीर नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर विरोधकांकडे ललित पाटील प्रकरणाची मोठ्या प्रमाणात माहिती असून त्यांची ही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. आरोप करणाऱ्यांनी याचेही उत्तर द्यावे की सचिन वांजे हा कुणाचा पार्टनर होता आणि त्याच्या माध्यमातून कोण वसुली फोन करत होते, असाही प्रश्न त्यावेळेस त्यांनी उपस्थित केला आहे.

सुनावणी कोणामुळे लांबणीवर ?

राज्यातून बाहेर येईल, राज्यात उद्योग जात असून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र राज्यात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून गुजरात आणि आसाममधूनही उद्योग राज्यात येत आहेत. या गोष्टी राज्यातील विरोधकांना दिसत नाहीत का? असाही प्रश्न यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. आमदार अपात्रेच्या संदर्भात वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र अपात्र त्या सुनावणी त्यावेळेस पिटिशन कोणी दाखल केले. सुनावणी कोणामुळे लांबणीवर होत आहे, हे राज्यातील सर्व जनतेला माहिती आहे की, वेळ कोणी मागून घेतला, सर्व सुनावण्या एकत्र घेण्याचे मागणी कोणी केली? हे जनतेला माहीत असून अध्यक्ष योग्य पद्धतीने काम करत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

इतर महत्वाची बातमी : 

Parbhani : ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203; मराठा आरक्षणासाठी आख्ख्या गावानेच वाजत गाजत भरला अर्ज

[ad_2]

Related posts