Jalgaon Latetst News Candidate Of ShivSena Should Be Given Against Me Open Challege From Gulabrao Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जळगाव  :बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आम्हाला शिकवण आहे. वडाचे झाड कितीही मोठे झाले तरी त्याच्या पारंब्या या जमिनीवरच राहत असतात, ती शिकवण आपण आजही जपून ठेवली आहे. झाड कोणतं आणि पारंबी कोणती हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर माझ्या विरोधात शिवसेनेचाच उमेदवार द्यावा’, असं ओपन चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना दिल आहे. 

उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. मागील काळात ही त्यांनी आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उमेदवार म्हणून राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावमध्ये असून आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद कोळी यांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना पाच वेळा जिंकली आहे. हिम्मत असेल तर माझ्या विरोधात शिवसेनेचाच उमेदवार द्यावा, सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद कोळी याना आव्हान दिले आहे. शरद कोळी यांनी आपल्या विरोधात शिवसेनेचाच उमेदवार द्यावा म्हणजे त्यांना कळेल, झाड कोणते आणि पारंबी कोणती ते… बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. वडाचे झाड कितीही मोठे झाले तरी त्याच्या पारंब्या या जमिनीवरच राहत असतात, ती शिकवण आपण आजही जपून ठेवली असल्याचे ते म्हणाले. 
    
ड्रॅग माफिया ललित पाटील (lalit Patil) यांचे जळगाव जिल्ह्यात राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना याबाबतचे पुरावे त्यांनी द्यावे आणि मग बोलावे हे सांगत असताना यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा जरी सापडला तरी त्याला माफ करता कामा नये, अस मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. या विषयावर चाळीसगाव येथील भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटल आहे की, ललित पाटील याला आता अटक करण्यात आली आहे. त्यातून काय ते सत्य बाहेर येणारच असून खडसे यांनी केलेले आरोप हे राजकीय आहेत. राजकारणातून एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करून ठेचण्यापेक्षा ड्रॅग मुळे तरुण पिढीचे नुकसान होत आहे. त्या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी प्रयत्न करायला हवे, या विषयाचं राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. 

 जळगावमधील राजकारण देखील महत्वाचं … 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून आडाखे बांधले जात असून स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत आमचाच पक्ष कसा पावरफुल आहे, हे पटवून दिले जात आहे. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये देखील अशा प्रकारची चढाओढ सुरु आहे. त्याचबरोबर कोण कुणाशी लढणार कोण कुठं लढणार याचं गणिते देखील आखली जात आहेत. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असलेल्या जळगावमधील राजकारण देखील महत्वाचं मानलं जात. मात्र सद्यस्थितीत येथील राजकारण पूर्णतः बदलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील हे आहेत. तर विरोधकांमध्ये मोठा चेहरा असलेल्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नेमकं काय घडतं हे पाहावे लागणार आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार, त्यांना काय मोठी खाती मिळतात, गुलाबराव पाटील रोखठोक

[ad_2]

Related posts