Majha Katta Majha Katta With Ncp Mla Rohit Pawar Comment On Sharad Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit pawar Majha Katta : दोन जुलैलै मला अजित पवार यांचा फोन आला नाही. कारण ते मला चांगले ओळखतात. मी भूमिका बदलणार नाही हे त्यांना माहित असल्यामुळं मला फोन आला नसल्याचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले. शपथविधी सुरु होता तेव्हा मी शरद पवारसाहेबांसोबत होतो. ते एकच म्हणाले की लढावं लागेल. यावेळी शरद पवारांनी मला तीन ऑप्शन दिले होते. एकतर राजकारण सोडून द्यायचे उद्योग व्यवसाय बघायचा. दुसरे निर्णय बदलायचा आणि तीन इथं राहायचं आणि संघर्ष करायचा. घरी जा आई वडिलांशी बोल, मुलांशी बोल मग निर्णय घे असे शरद पवार म्हणाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मी साहेबांसोब राहूल लढायचा निर्णय घेतल्याचे रोहित पवार म्हणाले.  

शरद पवार यांचे अनेक पैलू मला समजत नाहीत

शरद पवार साहेबांचे अनेक पैलू आहेत. त्यांचे अनेक पैलू मला समजत नाहीत. ते उघड काहीच बोलत नाहीत. त्यांच्या मनात काय हे आपल्याला समजून घ्यावं लागतं असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की तु चुकला म्हणून असे रोहित पवार म्हणाले. त्यांच्या मनातील राजकीय रणणिती अजिबात समजत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. पण पॉलिसीबद्दल समजते. 

रोहित पवार कोणाला फॉलो करतात

रोहित पवार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. शरद पवार, नितीन गडकरी हे डायनॅमिक आहेत. मी त्यांना फॉलो करतो. तसेच अनुराग ठाकूर यांना देखील फॉलो करतो असे रोहित पवार म्हणाले. 

 बुलेट ट्रेनची गरज नाही

मोठे प्रकल्प गुजरातला गेले. आता सध्या बुलटे ट्रेनची गरज नाही. गुजरातला जास्त स्टेशन म्हणजे 6 आहेत. तर तीन आपल्याकडे आहेत. त्या प्रवासासाठी विमानाचं आणि बुलेट ट्रेनचे तिकीट सेम असल्याचे रोहित पवार म्हणाले. एका नेत्याला खुश करण्यासाठी हे केलं जात आहे. ते एक लाख कोटींचे लोन शाळा होस्टेल बांधण्यासाठी वाररा असे रोहित पवार म्हणाले. 

माझ्यावर कारवाई होणार हे मला माहित 

बारामती अॅग्रोच्या संदर्भात कारवाई झाल्यावर तीन दिवस मी बाहेर होतो. या काळात मी वकिलांशी बोलत होतो. माझ्यावर कारवाई होणार हे मला माहित आहेत. त्यामुळं मी टेन्शन घेत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. अनेकवेळा बँकेडून आम्हाला लोन मिळताना अडचणी आल्याचे रोहित पवार म्हणाले. माझा अनुभव हा लोकातला आहे. लोकांचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही अडचणीतून बाहेर येऊ शकतो असे रोहित पवार म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Majha Katta : मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल? रोहित पवारांनी थेटच सांगितलं…

[ad_2]

Related posts