India Vs New Zealand Finally A Wicket For India After A Horrendous Time Rachin Ravindra Dismissed For 75

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धरमशाला : आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा पेपर अवघड का म्हणतात, याचं उत्तर पुन्हा एकदा टीम इंडियाला आज पुन्हा एकदा मिळालं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली. टीम इंडियाला सलग पाचव्या सामन्यात दमदार सुरुवात मिळाली. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 19 धावांमध्ये परतले. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रचिन रविंद्र आणि  डॅरिल मिशेल सामन्याचे चित्र पलटून टाकले. 

दोघांनी सुद्धा दमदार फलंदाजी करताना अर्धशतके झळकावली. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने मोठी रणनीती अवलंबताना टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी संयमाने खेळून काढली. मात्र, भारताचं प्रमुख अस्त्र असलेल्या फिरकीवर कडाडून प्रहार केला. त्यामुळे मागील चार सामन्यात किंग राहिलेल्या कुलदीप यादवला सर्वाधिक धावा चोपल्या गेल्या. रविंद्र जडेजावर प्रहार करण्यात आला. आजच्या सामन्यात जडेजाला एकही विकेट मिळाली नाही. कुलदीपच्या पहिल्या पाच षटकांत 48 धावा चोपल्या गेल्या. 

कधी नव्हे ते तीन झेल सुटले 

भारताची फिल्डींग संपूर्ण स्पर्धेत दिमाखदार राहिली. मात्र, आजच्या सामन्यात तब्बल तीन झेल सुटले. यामध्येही चित्त्यासारखा झेपावणाऱ्या जडेजाकडूनही रचिन रविंद्रचा झेल सुटला. त्यामुळे त्याला एक रिव्ह्यू आणि एक झेल असे एकाच षटकांत दोन जीवदान मिळाले. सिराजने त्याला बाद केले, पण रिव्ह्यूची मागणी केल्यानंतर तो पुन्हा यशस्वी ठरला. त्यामुळे आजच्या सामन्यात सर्वाधिक नशीबवान रचिन रविंद्र ठरला. अखेर त्याला शमीने बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. 

मिशेलला दोन जीवदान 

दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असलेल्या मिशेलला सुद्धा दोन जीवदान मिळाले. त्याचा अतिशय सोपा झेल पहिल्यांदा विकेटला राहुलने सोडल्यानंतर दुसरा आणखी एक झेल बुमराहने सोडला. त्यामुळे ज्यांनी न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला, त्यांनाच तीन जीवदान मिळाल्याने न्यूझीलंडच्या डावाला आकार आला.  

IND विरुद्ध NZ विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेटवर)

139* – रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल, धर्मशाला, 2023
136 – सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत, नागपूर, 1987
129* – राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ, सेंच्युरियन, 2003
127 – मोहम्मद अझरदुद्दीन आणि सचिन तेंडुलकर, ड्युनेडिन, 1992
116 – एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा, मँचेस्टर, 2019
100 – जॉन राइट आणि ब्रूस एडगर, लीड्स, 1979

ओव्हर समरी (21-30) : टप्पा विजेता – न्यूझीलंड

>> मिशेलने कुलदीपवर दबाव टाकणे सुरूच ठेवले
>> रवींद्रची आणखी एक फिप्टी
>> मिशेल आणि रवींद्रची 100 धावांची भागीदारी केली
>> या WC मध्ये मिचेलचे दुसरे अर्धशतक
>> रवींद्रचा पुन्हा एकदा यशस्वी रिव्ह्यू
>> राहुलकडून विकेटला मिशेलचा कॅच सूटला 

>> रवींद्रला आऊट करण्यात आले पण कॅच बॅकविरुद्ध रिव्ह्यू आणि यशस्वी
>> पॉइंटवर जडेजाने रचिन रवींद्रच्या चेंडूवर एक सोपा झेल सोडला
>> रवींद्र आणि मिशेलने षटकार ठोकल्याने कुलदीपने एका षटकात 16 धावा दिल्या
>> रवींद्र आणि मिशेलकडून न्यूझीलंडच्या डावाची पुनर्बांधणी 

[ad_2]

Related posts