Dhangar Reservation News 38 Years Old Commit Suicide For Dhangar Reservation At Jat Sangli Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सांगली :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेले आत्महत्येचं लोण आता धनगर आरक्षणापर्यंत (Dhangar Reservation) पोहचले आहे. सांगलीच्या (Sangli) जत (Jat Taluka) तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाचीवाडी येथे धनगर आरक्षणासाठी एका तरुणांना आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तशा आशयाची मजकूर असलेली चिठ्ठी देखील समोर आली आहे. बिरुदेव वसंत खर्जे (वय 38) असे या तरुणाचं नाव आहे.

शेतातल्या झाडाला गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. गावातील ग्रामस्थांनी देखील धनगर आरक्षणासाठी सदर तरुणाकडून आत्महत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. 

तर विशेष म्हणजे सांगलीच्या आरेवाडी येथे धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत असताना दुसऱ्या बाजूला बिरुदेव खर्जे या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरू झालंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धनगरांना आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे या मागणीने मागील दशकभरापासून जोर धरला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे यासाठी मेळावे घेत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.  आता, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आत्महत्या सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

‘मराठा आरक्षण, मगच इलेक्शन’, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट समोर

 मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला धक्कादायक वळण लागलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका 45 वर्षीय व्यक्तिने भर रस्त्यावर गळफास घेत आत्महत्या केलीय. सुनील कावळे असं त्याचं नाव आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलं. जालन्यातल्या मराठा आंदोलनात सुनील कावळे (Sunil Kawale) हा व्यक्ती सक्रीय होता अशी माहिती आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली. 

सुनील कावळेंनी मनोज जरांगेंना पत्र लिहिली आहे.  सुनील कावळेंचं मृत्यूपूर्व पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षण, मगच इलेक्शन असा इशारा सुसाईड नोटमधून देण्यात आला आहेय.  या पत्रात त्यांनी 24 ऑक्टोबरला त्यांनी मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच पत्राच्या शेवटी माफी देखील मागितली आहे.

 व्हिडीओ : धनगर आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन, सूसाईड नोटमध्ये नेमकं काय?

[ad_2]

Related posts