Maratha Reservation Another Youth Commits Suicide For Maratha Reservation In Nanded Two Suicides In 24 Hours Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नांदेड : मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वात आरक्षणाची  मागणी करत राज्यभरातील मराठा समाज (Maratha Samaj) एकवटला आहे. सर्व मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी आणखी तीव्र होत आहे.  मात्र दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच. नांदेडमध्ये (Nanded) आणखी एका तरुणाने आरक्षणसाठी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. . तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असा उल्लेख चिठ्ठीमध्ये उल्लेख केला आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप मराठा संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. भोपाळ (ता.नायगाव) येथील ओमकार आनंदराव बावणे (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओमकारने रविवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी गावाशेजारील जंगली पीरजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मृत्यूपूर्वी ओमकारने विहिरीवर चिठ्ठी लिहून ठेवली होती. विहिरीवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘माझे आई वडिल मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवतत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे,’ असा चिठ्ठीमध्ये उल्लेख केला आहे. आरक्षणप्रश्नी एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली अजून याचा समाजातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. दरम्यान मराठा संघनेतर्फे घोषणाबाजी देखील करण्यात आली 

 रविवारी झाली होती एक आत्महत्या

रविवारीच नांदेडमधील तरुणानं विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली होती. नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव इथल्या शुभम सदाशिव पवार या तरुणानं आपलं जीवन संपवलं. शुभमनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती.

भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना ह्या दुर्दैवी आणि दु:खदायक, वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की समाजातल्या माझ्या भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, अशी भावनिक साद देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे ही वाचा :

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलंलं टोकाचं पाऊल, विष प्राशन करत आयुष्य संपवलं

[ad_2]

Related posts