Former India Captain Bishan Singh Bedi Has Died At The Age Of 77 In Delhi Widely Considered One Of The Game Greatest Left-arm Spinners

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे बिशनसिंग बेदी यांचे आज (23 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 77व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. बिशनसिंग बेदी (Bishan Sing Bedi) दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते आणि त्यांचे नाव जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये घेतले जाते. 

भारताच्या महान फिरकी त्रिकूटांपैकी एक 

महान फिरकीपटू राहिलेल्या बिशनसिंग बेदी यांनी 1967 ते 1979 या कालखंडात भारतासाठी 67 कसोटी खेळल्या आणि 266 विकेट घेतल्या. तसेच 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. बिशनसिंग बेदी, एरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस वेंकटराघवन हे भारतीय फिरकीचे महान त्रिकूट होते. टीम इंडिया आज तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी संघर्ष करत असताना त्यावेळी भारताच्या पहिल्या एकदिवसीय विजयात बिशनसिंग बेदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमृतसरमध्ये जन्मलेल्या फिरकीपटू बेदी यांनी देशांतर्गत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 370 सामन्यांमध्ये 1,560 विकेट घेतल्या.

1976 मध्ये टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नियुक्ती

गोलंदाजीशिवाय बिशनसिंग बेदी यांच्याकडे नेतृत्व क्षमताही होती. बिशनसिंग बेदी यांची 1976 मध्ये टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी 1978 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. बिशनसिंग बेदी हे एक कर्णधार म्हणून ओळखले जातात ज्यांनी संघात लढण्याची क्षमता निर्माण केली आणि शिस्तीबाबत नवीन मानदंड प्रस्थापित केले. कर्णधार म्हणून बेदींनी एक नवीन इतिहास रचला. कर्णधार म्हणून, बिशनसिंग बेदी यांनी 1976 मध्ये त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत त्या काळातील सर्वात बलाढ्य संघ वेस्ट इंडिजचा पराभव केला.

भारतीय क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत योगदान 

क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही बिशनसिंग बेदी यांचा खेळाशी असलेला संबंध संपला नाही. बिशनसिंग बेदी यांनी या खेळाशी स्वत:ला दीर्घकाळ जोडून ठेवले. समालोचक म्हणूनही बेदींनी क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. प्रशिक्षक म्हणूनही बिशनसिंग बेदी दीर्घकाळ क्रिकेटशी जोडले गेले. एवढेच नाही तर फिरकी विभागात भारताला मजबूत ठेवण्यासाठी बिशनसिंग बेदी यांनी नवीन खेळाडूंना प्रशिक्षण दिले आणि भारतीय क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले.

बिशनसिंग बेदी यांनी 31 डिसेंबर 1966 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्स येथे आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली, तर ऑगस्ट-सप्टेंबर 1979 मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. दुसरीकडे, पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै 1974 रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध खेळला गेला, तर शेवटचा एकदिवसीय सामना 16 जून 1979 रोजी मँचेस्टर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला.

टीम इंडियाचे कॅप्टन

मन्सूर अली खान पतौडी 1961-62 ते 1969-70 पर्यंत 36 कसोटी सामन्यांसाठी कर्णधार होते. 1974-75 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी चार सामन्यांसाठी परतले. त्यांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांत, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये संघाचा व्हाईटवॉश झाला. 1967-68 मध्ये पतौडी यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व त्यांच्या पहिल्या न्यूझीलंड दौर्‍यावर केले, जी भारताने कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. 

1970-71 मध्ये अजित वाडेकर यांनी पतौडी यांच्याकडून कर्णधारपद स्वीकारले. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली. भारताने 1974 मध्ये पहिला पुरुष एकदिवसीय सामना खेळला, तो देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. भारताने 1975 मध्ये क्रिकेट विश्वचषकात श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली पूर्व आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध पहिला पुरुष एकदिवसीय सामना जिंकला. 1975-76 आणि 1978-79 दरम्यान बिशन सिंग बेदी यांनी 22 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्यामध्ये 6 कसोटी आणि एक वनडे जिंकली. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts