Pakistan Vs Afghanistan Ibrahim Zadran Has 4 Hundreds And 5 Fifties In Just 24 Innings In ODIs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : वर्ल्डकप हारा, पण पाकिस्तानला मारा अशी म्हण कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर कोरली गेली आहे. ती कामगिरी टीम इंडियाने सलग आठ वर्ल्डकपमध्ये करताना चाहत्यांना कधीच मानसिक धक्का दिलेला नाही. असाच काहीसा जोश आणि जिद्द अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यात दिसून येते. अफगाण चाहते नेहमीच आपल्या संघासह टीम इंडियाला साथ देताना दिसून येतात. 

चेन्नईमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान लढत झाली. पाकिस्तानने 283 धावांचे आव्हान दिल्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात रहमतुल्लाह गुरबाज आणि अवघा 21 वर्षीय असलेल्या इब्राहिम झरदानने केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 130 धावांची सलामी दिली. गुरबाज 65 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रहमत शाहने झरदानला उत्तम साथ दिली. झद्रान अवघ्या 13 धावांपासून वंचित राहिला. त्याला हसन अलीने 87 धावांवर बाद केले आणि एका अविस्मरणीय खेळीचा शेवट झाला. मात्र, रहमत शाह आणि हशमतुल्लाहने नाबाद भागीदारी करत संघाला दुसरा अविस्मरणीय विजय मिळवून दिला. तब्बल आठ विकेट राखून अफगाणिस्तानने दुसऱ्यांदा इतिहास रचला आहे. 

झरदानच्या वनडे कामगिरीला सलाम ठोकण्याची वेळ!

9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकने अफगाणिस्तान बेचिराख करून टाकले. संपूर्ण देश मातीत गाढला गेला. अशी भयावह परिस्थिती देशात असताना डिसेंबर 2001 मध्ये झद्रानचा जन्म झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या झरदानने आतापर्यंत अफगाणिस्तानकडून पर्दापण केल्यापासून दमदार कामगिरी केली आहे. 

झरदाने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी केवळ 24 एकदिवसीय सामने खेळले आहेत, पण त्याने तब्बल चार शतकांची नोंद केली आहे. तसेच पाच अर्धशतकांची नोंद केली आहे. झरदानची वनडे क्रिकेटमधील सरासरी तब्बल 50+ आहे यावरुन या खेळाडूच्या प्रतिभेची कल्पना येते. वर्ल्डकपमध्ये खेळत असलेल्या अफगाणिस्तान संघाचे सरासरी वय 24 आहे. यावरून या खेळाडूंच्या क्षमतेची कल्पना येते. याच संघाने विश्वविजेत्या इंग्लंडला मात दिली. 

कसोटी पदार्पणात अर्धशतक, देशांतर्गत सातत्यपूर्ण कामगिरी 

इब्राहिम झरदान आपल्या कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण क्रिकेटपटूंपैकी एक आहे. दुसऱ्या डावातील इब्राहिम झरदानची कामगिरी अफगाणिस्तानसाठी निर्णायक ठरली होती. अफगाणिस्तानने बांगलादेशला नंतरच्या डावात उद्ध्वस्त करून आपला दुसरा कसोटी सामना जिंकला होता. झद्रानने अफगाणिस्तानमध्ये देशांतर्गत कारकिर्दीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इब्राहिमची गुणवत्ता आणि अफगाणिस्तान संघाची कामगिरी पाहता निश्चितच मोठी झेप घेईल हे आताच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते.

अफगाणिस्तान भूकंपातही बेचिराख 

तालिबानी राजवटीने दहशतीखाली असलेल्या अफगाणिस्तानात गेल्या काही महिन्यात भूकंपानेही कहर केला आहे. आतापर्यंत अडीच हजारांवर मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे देशातील स्थिती पाहून क्रिकेटरही आपले दु:ख लपवू शकले नाही. अफगाण क्रिकेटचा चेहरा राशीद खानने इंग्लंडविरुद्ध विजयानंतर दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. सध्या आमच्या देशाला क्रिकेट हाच आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली होती. बाकी काहीच आमच्यासाठी घडत नसल्याचे तो म्हणाला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts