Solapur Nehru Yuva Kendra Liquor Bottle Case Employee Subhash Chavan Suspended

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर: नेहरू युवा केंद्राचे (Solapur Nehru Yuva Kendra) मल्टी टाक्सिंग कर्मचारी सुभाष चव्हाण याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेहरू युवा केंद्रात दारूच्या बाटल्या ठेवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या नेहरू युवा केंद्रातच दारूच्या बाटल्या आढल्याचे वृत्त एबीपी माझाने दाखवले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

नेहरू युवा केंद्रातील हा सगळा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघड केला होता. त्यानंतर एमटीएस सुभाष चव्हाण याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. नेहरू युवा केंद्रात दारूच्या बॉटल सापडणे आणि अन्य काही आरोप सुभाष चव्हाण याच्यावर लावण्यात आले आहेत. प्रसारित झालेल्या वृत्तानुसार सुभाष चव्हाण हा प्राथमिक स्तरावर दोषी आढळले आहेत. चव्हाण यांच्या अशा वर्तणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नेहरू युवा केंद्र संघटनाची प्रतिमा मलीन झाली आहे असं केंद्राच्या निवेदनात म्हटलं आहे. 

नेहरू युवा केंद्रात उपरोक्त घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घटनेची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांना तात्काळ संबंधित कर्मचाऱ्याचा रिपोर्ट करण्यास कळवले. त्यानुसार अजित कुमार यांनी संबंधित कर्मचारी आणि घडलेल्या घटनेविषयी सविस्तर अहवाल त्यांचे वरिष्ठ कार्यालय आणि जिल्हा प्रशासनास केला. 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची घेतलेली गांभीर्यपूर्वक दखल आणि केलेला पाठपुरावा यामुळे नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण याला त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने निलंबित केलेले आहे. जिल्हा प्रशासनात अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना खपवून घेतली जाणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आलेला आहे.

नेमकी काय आहे घटना?

नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती. कार्यालयातील मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून नियुक्त असलेल्या सुभाष चव्हाण याने या दारू बॉटल आणल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे नेहरू युवा केंद्र तरुणातील व्यसनधिनता संपवण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम देखील चालवते, त्याच नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळणे धक्कादायक आहे.

सुभाष चव्हाण याच्या बाबतीत भाजपच्या कार्यकर्त्यांना काही तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारी संदर्भात निवेदन देण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि यतीराज होनमाने हे नेहरू युवा केंद्रात गेले होते. यावेळी कार्यालयात दारूचे रिकामे ग्लास आणि बॉटल्स भाजप पदाधिकऱ्यांना आढळून आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना सभागृह उघडून दाखवयाला सांगितले. त्यानंतर या सभागृहात दारूच्या बॉटल्स आणि ग्लास आढळून आणले. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts