Shivaji Maharaj Hindavi Swaraj Was Concept Of Hindu Rashtra Said RSS Chief Mohan Bhagwat At Nagpur Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mohan Bhagwat:  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र असे मत संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाचा आज समारोपाचा कार्यक्रम नागपुरात पार पडला. नागपूर संघाच्या रेशीम बाग कार्यालयात गेले 25 दिवस तृतीय वर्षासाठीचे संघ शिक्षा वर्ग सुरू होते. यात देशभरातील 686 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. आज समारोपाच्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 

सरसंघचालकांनी पुढे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे राष्ट्राच्या (भारताच्या) स्वत्वची घोषणा केली होती, आणि आम्ही इथे हिंदवी स्वराज्य स्थापन करू असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी सहकारी गोळा केले, प्रेरणा दिली, संस्कार दिले, जुनी मूल्ये जागृत केली. गोवध थांबविले, मातृभाषेत राज्याचे व्यवहार सुरू केले, नौदल तयार केले, इतर धर्मांत गेलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतले, काशीचा मंदिर तोडणाऱ्या औरंगजेबाला खरमरीत पत्र पाठवत तुम्ही हे थांबविले नाही तर मला उत्तरेत तलवार घेऊन यावे लागेल असा इशारा महाराजांनी दिला. 

एकंदरीत या देशाबद्दल आपुलकी ( नातं ) ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. तेच तर हिंदवी स्वराज्य आहे आणि त्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे सरसंघचालक म्हणाले. भागवत एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी स्वयंसेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अंगीकारण्याची सूचना ही केली. स्वंयसेवकाना कोणी सगुण आदर्श हवा असेल, तर माझं मत आहे की प्राचीन काळात हनुमानजी आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वांगीण आदर्श आहेत असे सरसंघचालक म्हणाले. 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, इस्लामची पूजा कुठे सुरक्षित आहे? हेच (भारतात) सुरक्षितपणे चालते. हे सहजीवन शतकानुशतके चालत आले आहे, पण ते ओळखता येत नाही, परस्पर मतभेदाचे धोरण चालवणे कितपत ठीक आहे, कोणी ना कोणी ही गोष्ट (मुस्लिमांना) समजावून सांगावी. असे वक्तव्य संघप्रमुख मोहन भागवत यांनी केले. आपली वेगळी ओळख भारतातच सुरक्षित आहे, पण आपली ओळख भारताबाहेरील मूळ अस्मितेपेक्षा वेगळी असेल, तर तिथे आनंदाने राहणे कठीण आहे, असे संघप्रमुख डॉ.भागवत यांनी सांगितले. स्पेनपासून मंगोलियापर्यंत जगभरात इस्लामचे आक्रमण झाले, परंतु हळूहळू तेथील लोक जागरूक झाले आणि त्यांनी आक्रमकांना पराभूत केले आणि इस्लाम आपल्या कार्यक्षेत्रात संकुचित झाला. जिथे इस्लाम होता तिथे आता सर्व काही बदलले आहे, आक्रमक परकीय इथून गेले आहेत, पण इस्लामची पूजा कुठे सुरक्षित आहे, तर इथे सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. 

संघप्रमुख म्हणाले, ही आपली मातृभूमी आहे हे विसरून आपण फक्त आपली पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे हे लक्षात ठेवतो. पण समाज म्हणून आपण या देशाचे आहोत, आपले पूर्वज याच देशाचे आहेत, हे वास्तव आपण का स्वीकारत नाही? आपली वैशिष्ट्ये आणि वैविध्य हेच आपल्या विभक्त होण्याचे कारण आहे, परंतु आपण हे विसरता कामा नये की प्राचीन काळापासून सर्वांना सोबत घेऊन चालणारी संस्कृती आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

[ad_2]

Related posts