Uddhav Thackeray Dasara Melava Sushma Andhare On Sanjay Raut Empty Chair Eknath Shinde Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर (Shivaji Park)  होईल तर शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.आजच्या दसरा मेळाव्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. दोन्ही नेते व्यासपीठावरून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.  गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वक्तव्य केले आहे. गेल्यावर्षी एक खुर्ची रिकामी  संजय राऊतांची (Sanjay Raut) एक खुर्ची रिकामी होती. मात्र यंदा संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार आहे, असं मत अंधारे यांनी व्यक्त केलंय

सुषमा अंधारेंनी या वेळी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यावर देखील टीका केली आहे.   मुंबईमध्ये दसरा मेळावा हा एकच असतो बाकी ‘ इव्हेंट’ चे आम्हाला माहिती नाही. आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक कष्टाची भाकरी घेऊन शिवतीर्थावर पोहचत आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

गेल्यावर्षी संजय राऊत एक खुर्ची रिकामी होती यंदा…

गेल्या वर्षीच्या दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यात एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही ठिकाणी एक एक खुर्ची रिकामी ठेवली जाणार आहे. शिंदे गटाकडून व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवली होती. तर ठाकरे गटाकडून संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. संजय राऊत तुरुंगात असल्याने खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. याविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,  गेल्यावर्षी संजय राऊत एक खुर्ची रिकामी होती. यावर्षी संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार आहे आणि हा आमचा आनंदाचा क्षण आहे.

एकनिष्ठतेच्या बाता मारू नये

मुंबईतील आझाद मैदानावर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याचा  टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला होता.  शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व! शिवसेनेचा दसरा मेळावा… चलो आझाद मैदान… अशा आशयाचा तो टीझर होता. या टीझरवर देखील सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,  ज्यांच्या टिझर मध्ये एकनाथ,    एकलव्य एक पक्ष एक विचार असं आहे, परंतु एकनिष्ठ हा शब्द नाहीय. हा शब्द लिहायची हिम्मत झाली नाही, त्यांनी एकनिष्ठतेच्या बाता मारू नये. 

 

[ad_2]

Related posts