Anyone Who Tries To Separate Mumbai From Maharashtra Will Be Dismembered: Uddhav Thackeray

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray on Mumbai : कोरोना काळातील घोटाळे चौकशी करत आहात, तर मग ठाणे, पुणे, नागपूर महापालिकेची पण करा, हिंमत असल्यास पीएम केअर आणि जम्मूपर्यंत चौकशी करा, आम्ही मुंबई, महाराष्ट्र वाचवले त्याचे कौतुक नाही. आमच्या अंगावर येतायत पण शेण हे खातायत, पीएम केअर फंड घोटाळ्याचं काय? अशी थेट विचारणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केली. 

जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे होतील, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, किती जणांना बुलेट ट्रेनचा उपयोग होणार? इथल्या गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावे म्हणून ही बुलेट ट्रेन आहे. जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे होतील. मुंबई आर्थिक राजधानी आहे का? कारण सगळे गुजरातला चालले आहे, फिल्मसिटी उत्तर प्रदेशाला नेत आहेत, असेही ठाकरे म्हणाले. 

https://www.youtube.com/watch?v=3b-k1CYAzMA

धारावीचा विषय मी बघणार आहे

धारावी पुनर्विकास मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, धारावीचा विषय मी बघणार आहे, कोण तो तुमचा मित्र? माझे डोळे पांढरे झाले, दीडशे कोटींचा एफएसआय हा विकास मित्राचा विकास करायला. ते पुढे म्हणाले की, गिरणी कामगाराच्या मुलाला पण घरे द्या. धारावीचा विकास तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेन तर आम्ही ते होऊ देणार नाही, रस्त्यावर उतरू. जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे होतील. संजय राऊत भ्रष्ट्राचारावर बोलले, पण उद्या सरकार आपले येणारच. आम्हाला आज त्रास देतायत पण तुम्हाला उलटे टांगू. 

मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतो, अत्यंत समजदारपणाने आंदोलन  

दरम्यान, उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनाही धन्यवाद दिले. ते म्हणाले की, जरांगे पाटलांना धन्यवाद देतो, धनगरांना त्यांनी साथ दिली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मराठा आरक्षण प्रश्न होताच पण तेव्हा मी मारहाणीचा आदेश दिला नव्हता. गद्दारांमध्ये हिम्मत असेन तर हा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. हा विषय लोकसभेत सोडवा, पोट कोणत्याही जातीचे असो ते भरायलाचा पाहीजे हे राज्यकर्त्यांचे काम असते. मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतो, अत्यंत समजदारपणाने आंदोलन करत आहेत, अशा शब्दात शिवसेना दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts