Petrol Diesel Rate Today On 25 October 2023 Crude Oil Price Changes Know Latest Price In Prayagraj Patna Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol Diesel Rate on 25 October 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किंमतींमध्ये सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. भारतीय पेट्रोल (Petrol Price Today) कंपन्यांनी आज, बुधवारी पेट्रोल (Petrol Price) डिझेलचे नवे (Diesel Price) दर जाहीर केले आहेत. यानुसार काही शहरांमध्ये इंधनाच्या दरात (Fuel Rate Today) बदल झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आज ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 0.2 टक्क्यांची वाढ दिसून आली असून त्याची किंमत प्रति बॅरल  88.09 डॉलरवर पोहोचली आहे. WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.11 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे आणि WTI क्रूड ऑइलच्या प्रति बॅरल 83.65 डॉलर झाली आहे. आज दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत, जाणून घ्या.

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • मुंबई – पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
  • नवी दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
  • कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
  • चेन्नई – पेट्रोल 102.66 रुपये, डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर.

‘या’ शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल

  • प्रयागराज – पेट्रोल 66 पैशांनी 96.66 रुपये, डिझेल 65 पैशांनी 89.86 रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
  • अमृतसर- पेट्रोल 27 पैशांनी 98.47 रुपये, डिझेल 25 पैशांनी 88.79 रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
  • नोएडा – पेट्रोल 6 पैशांनी महागले असून ते 96.65 रुपये, डिझेल 6 पैशांनी महागले असून ते 89.82 रुपये प्रतिलिटरवर उपलब्ध आहे.
  • गुरुग्राम – पेट्रोल 28 पैशांनी 96.71 रुपये, डिझेल 27 पैशांनी 89.59 रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
  • लखनौ – पेट्रोल 10 पैशांनी 96.47 रुपये, डिझेल 10 पैशांनी 89.66 रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
  • पाटणा – पेट्रोल 30 पैशांनी 107.24 रुपये, डिझेल 28 पैशांनी 94.04 रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.

दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

[ad_2]

Related posts