[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
धुळे : दोन दिवसांपूर्वी धुळे (Dhule) तालुक्यातील नंदाळे बुद्रुक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात (Leopard Attack) लहान मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर लागलीच तालुक्यातीलच बोरकुंड येथील सहा वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हार्दिक उर्फ स्वामी दीपक रोकडे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने पुन्हा एकदा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत असून तीन दिवसांच्या अंतरात दोन लहान बालकांचा मृत्यू (Death) झाल्याने दहशतीचे वातावरण आहे.
धुळे तालुक्यातील (Dhule District) बोरकुंड येथे बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत शिरूड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे गाव हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वामी दीपक रोकडे असे मयत मुलाचे नाव आहे. तो आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात खेळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने हल्ला करीत त्याला उचलून घेऊन ठार केले. या घटनेनंतर बोरकुंड परिसरातील नागरिकांनी शिरुड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी वनविभाग (Forest) आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष व्यक्त करण्यात आला.
दरम्यान शेतात आजोबांचे बोट धरून चालणाऱ्या नातवाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. हार्दिक उर्फ स्वामी दीपक रोकडे असे मृत बालकाचे नाव आहे. बिबट्याने लहान मुलांवर हल्ला करून ठार मारण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. नंदाळे शिवारात 9 महिन्यांच्या बालिकेवर वन्यप्राण्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला होता. विंचूरचे नामदेव रोकडे मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह नातवांना घेऊन शेतात कापूस वेचणीला गेले होते. त्यांच्या खांद्यावर लहान नातू होता तर पाच वर्षांचा मोठा नातू स्वामी हा त्यांचे बोट धरून चालत होता. त्यातच दबा धरून बसलेल्या बसलेल्या बिबट्याने लहान मुलावर झडप घातली. यात स्वामींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांतील दुसरी घटना
धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीच्या मृत्यूची घटना ताजी असताना दसऱ्याच्या दिवशीच बोरकुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत शिरूड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे गाव हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी देखील नंदाळे बुद्रुक शिवारात हिंस्र प्राण्याने आठ महिन्यांच्या चिमुकलीला शेतात काम करीत असलेल्या आईच्या समोर उचलून घेऊन ठार केले. तीन दिवसांतील ही दुसरी घटना असून यावेळी वनविभाग आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष व्यक्त करण्यात आला.
इतर महत्वाची बातमी :
Dharashiv News : धाराशिवमध्ये बिबट्याच्या शोधात वन कर्मचाऱ्यांची रानोमाळ भटकंती, पण काही केल्या बिबट्या सापडेना
[ad_2]