[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) शुक्रवारी एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsha Yatra) शुक्रवारीही शिरूर तालुक्यातच असणार आहे, त्या दरम्यानही त्यांनी अन्नत्यागाचा निर्णय घेतला आहे. सणसवाडी येथील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.
आमदार रोहित पवार म्हणाले की, जरांगे पाटील आज उपोषणाला परत बसले आहेत. आमची युवा संघर्ष यात्रा युवकांच्या हिताची आहे. युवकांना आज नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण महाग होतंय, बेरोजगारी वाढतेय. एक सामाजिक कार्यकर्ता जर उपोषण करत असेल तर सरकारने पुढाकार घ्यावा. जर तुम्ही घटना दुरूस्ती करू शकता तर मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही? या समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायला पाहिजे, वारंवार कोणीतरी कोर्टात जाऊन त्याला आव्हान देऊ शकणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे.
मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून #युवा_संघर्ष_यात्रा सुरू असताना उद्या (गुरुवार) एक दिवस मी अन्नत्याग करत आहे.#YuvaSangharshYatra #yuva… pic.twitter.com/xY4npdi4CS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2023
एक दिवस अन्नत्याग करणार
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रोहित पवारांनी आपण एक दिवस अन्नत्याग करत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण एक दिवस अन्नत्याग करणार आहे. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आपण रोज 18 ते 20 दिवस चालतोय. अशा परिस्थितीतही आपण अन्नत्याग करणार आहोत. संघर्षाच्या काळात आपण एकमेकांच्या साथीला येणं गरजेचं आहे.
असा असेल युवा संघर्ष यात्रेचा प्रवास
युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास असेल. पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.
ही बातमी वाचा:
[ad_2]