Ahmednagar Latest News Prime Minister Narendra Modi Praised Deputy Chief Minister Ajit Pawar Program In Shirdi Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर : साईबाबांनी येथील जनतेला सुख दुःखावर मात करण्याची शक्ती दिली. त्याचबरोबर सबका मलिक एक असं सांगत येथील जनतेला जगण्याचा मूलमंत्र दिला. तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सबका साथ सबका विकास या घोषणेच्या माध्यमातून मागील दहा वर्षात देशाला बळकट करण्याचे काम केले आहे. आजही याच घोषणेच्या माध्यमातून देशात विकास होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. शिर्डीच्या साईमंदिरात लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. जसा साईबाबा भक्तांना दिशा दाखविण्याचे काम करतो, येथील मंदिरात आल्यानंतर भाविकांना नवीन ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन देशाच्या नागरिकांमध्ये होत आहे. साईबाबानी ‘सबका मलिक एक’ असा संदेश दिला. याच संदेशांच्या पावलावर पाऊल ठेवत पीएम मोदी यांनी देशाला सबका साथ सबका विकासाचा नारा दिला. या नाऱ्यातून मागील दहा वर्षात देशात विकासाची गंगा वाहिली आहे. याच घोषणेच्या मार्गाने देशाचा विकास होत असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. 

अजित पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विकासाचे समीकरण असून म्हणून आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत. कोणतेही संकट असो, छातीचा कोट करून पीएम मोदी संकटावर मात करत असतात. त्यांच्या वेगवगेळ्या संकल्पनांमुळे राष्ट्र बळकट होत आहेत. आणि त्यादृष्टीने मोदी काम करत आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली सगळ्याचा भलं करण्याचं काम सुरु असून आम्ही सर्व जाती धर्माच लोकांचं भलं करण्याचं काम करतो आहोत. पुढं देखील महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू, असंही अजित पवार म्हणाले. 

 साई मंदिरातून भाविकांना आंतरिक ऊर्जा

शिर्डीच्या साई मंदिरातुन भाविकांना आंतरिक ऊर्जा मिळत असते. पीएम नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून लोककल्याणाच्या कार्य होत आहे. साईमंदिर परिसरात वेगवगेळे प्रकल्प सुरु करण्यात आले असून यामुळे भाविकांना चांगली सोया उपलब्ध होणार आहे. तसेच आजच्या अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे धरणाचा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पावणेदोन लाख क्षेत्र हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून मात्र शेतकऱ्यांनी पाणी बचतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आगामी काळात आपल्या बांधवाना या धरणाचा चांगला उपयोग होऊ शकतो असेही अजित पवार म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी : 

PM Narendra Modi Shirdi Visit Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यात काय काय करणार?

[ad_2]

Related posts