Agriculture News The Money Of Namo Shetkari Samman Yojana Is Deposited In The Account Of Farmers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agriculture News :  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. 

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी या योजनेला गती दिली. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने पासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष ड्राईव्ह घेतला. 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री यांनी केली धनंजय मुंडे यांची विचारपूस

दरम्यान, या योजनेबद्दल बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे भावुक झाले. ते म्हणाले की, हाडाचे शेतकरी असलेले माझे वडील कै. पंडितांअण्णा मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. संयोगाने याच दिवशी या ऐतिहासिक योजनेचा शुभारंभ व्हावा, ही त्यांना नियतीने वाहिलेली एक प्रकारची श्रद्धांजली आहे. ते असते तर आज खूप आनंदी झाले असते असे मुंडे म्हणाले.  नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ शिर्डी येथे झाला, त्यावेळी व्यासपीठावर अनेक मंत्री उपस्थित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला.  “क्यों धनंजय…कैसे हो?”अशी त्यांच्या शैलीत केलेली विचारपूस चर्चेचा विषय ठरली.

शेतकऱ्यांच्या आनंदाला भरते

अनेक शासकीय योजना येत असतात आणि जात असतात. या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने किती जणांना मिळतो हा सतत चर्चेचा विषय असतो. आज नमो शेतकरी सन्मान योजनेतून खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कुठेही अर्ज आणि कागदपत्रांची झंझट नाही, कोणी मध्यस्थी नाही असे असताना खात्यावर 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना अनपेक्षित समाधान देऊन गेला. शेतकऱ्यांनी हे संदेश इतरांना दाखवून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून शासनाच्या आभार व्यक्त केले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आणि दुबार तिबार पेरणीचे संकट झेललेल्या शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळत आहे.

या योजनेतून जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेली रक्कम

अहमदनगर- 5,17,611 शेतकऱ्यांना 103.52 कोटी 
अकोला -1,87,816 शेतकऱ्यांना 37.56 कोटी 
अमरावती 2,65,916 शेतकऱ्यांना 53.18 कोटी
संभाजीनगर (औरंगाबाद) 3,26,840 शेतकऱ्यांना 65.37 कोटी
बीड 3,89,527 शेतकर्‍यांना 77.91 कोटी
भंडारा 186031 शेतकर्‍यांना 37.21 कोटी
बुलढाणा 331894 शेतकर्‍यांना 66.38 कोटी 
चंद्रपूर 216613 शेतकर्‍यांना 43.32 कोटी 
धुळे 142441 शेतकर्‍यांना 28.40 कोटी 
गडचिरोली 129639 शेतकर्‍यांना 25.93 कोटी 
गोंदिया 212418 शेतकर्‍यांना 42.48 कोटी 
हिंगोली 180576 शेतकर्‍यांना 36.12 कोटी 
जळगाव 379549 शेतकर्‍यांना 75.91 कोटी 
जालना 289771 शेतकर्‍यांना 57.95 कोटी 
कोल्हापूर 406240 शेतकर्‍यांना 81.25 कोटी 
लातूर 267300 शेतकर्‍यांना 53.46 कोटी 
नागपूर 150414 शेतकर्‍यांना 30.08 कोटी 
नांदेड 377415 शेतकर्‍यांना 75.48 कोटी 
नंदुरबार 96585 शेतकर्‍यांना 29.32 कोटी 
नाशिक 385347 शेतकर्‍यांना 77.07 कोटी 
धाराशिव (उस्मानाबाद)- 211409 शेतकर्‍यांना 42.28 कोटी 
पालघर 80336 शेतकर्‍यांना 16.07 कोटी 
परभणी 267107 शेतकर्‍यांना 53.42 कोटी 
पुणे 389842 शेतकर्‍यांना 77.97 कोटी 
रायगड 98264 शेतकर्‍यांना 19.65 कोटी 
रत्नागिरी 127600 शेतकर्‍यांना 25.52 कोटी 
सांगली 367179 शेतकर्‍यांना 73.44 कोटी 
सातारा 393334 शेतकर्‍यांना 78.67 कोटी 
सिंधुदुर्ग 108103 शेतकर्‍यांना 21.62 कोटी 
सोलापूर 454040 शेतकर्‍यांना 90.81 कोटी 
ठाणे 68367 शेतकर्‍यांना 13.67 कोटी 
वर्धा 123376 शेतकर्‍यांना 24.68 कोटी 
वाशिम 154052 शेतकर्‍यांना 30.81कोटी 
यवतमाळ 277130 शेतकर्‍यांना 55.43कोटी

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : अखेर मुहूर्त सापडला! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उद्या शुभारंभ, कोणाला मिळणार लाभ?

[ad_2]

Related posts