Hingoli Maharshtra Famer Did Sucide His Daughter Worte A Letter To CM Eknath Shinde Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हिंगोली : ‘तुमच्या घरी दसरा झाला पण आमच्या घरात दसरा आणि दिवाळी दोन्ही सण साजरे होणार नाहीत’, अशा आशयाचं पत्र हिंगोलीत (Hingoli) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या लेकीनं लिहिलं आहे. हे पत्र या लेकिनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (Eknath shinde) लिहिलं आहे. हिंगोली जिल्हा हा राज्यातील मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच हिंगोलीमध्ये सतत असणारी नापीक आणि कर्जबाजारीपणामुळे बळीराजा टोकाचं पाऊल उचलतो. पण त्यामुळे त्याच्या कुटुंबाची मात्र यामध्ये फरफट होते. 

पाच तालुक्यांनी हिंगोली हा जिल्हा तयार झालाय. पण याा जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत तब्बल 35 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं वास्तव समोर आलं. तुमच्या घरी सगळे सण साजरे झाले पण आमच्या घरी काहीच नाही, असं म्हणत या लेकिने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची सुरुवात केली. 

पत्रात काय म्हटलं?

सर तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि तुमची दिवाळी पण चांगली जाईल पण आमच्या घरी दसरा नाही दिवाळी नाही. आई रडत असते सारखी म्हणते भाव असते तर तुमचा बाबा मेला नसता.वावरात सोयाबीन कमी झालं आणि  आईने बाबांना भांडण केलं. त्यानंतर आमचे बाबा पुन्हा आलेच नाहीत. आजीला विचारलं तेव्हा आजी म्हणते देवा घरी गेला. मुख्यमंत्री सर देवाचं घर कुठे आहे? त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला पाठवा लवकर.  दिवाळी येणार आहे आमच्या घरी दोन दीदी मी आणि दादा आहोत. रोज बाबा ची वाट पाहतो पण ते नाही येत. मग आम्हाला दिवाळीला रिसोडला बाजारात कोण नेईल? नवीन कपडे कोण घेईल? तुमचे बाबा गेले बाहेर की दिवाळी होते का तुमची ? तुम्हाला बाजारात कोण नेतं? लोकं म्हणतात सरकारमुळं तुमचा बाप देवाघरी केला. हे खरं आहे का?  देवाला सांगून बाबाला पाठवा.आम्हाला दिवाळी बाजारात जायचं आहे. बाबांना सांगा की तुमची दीदी रडतेय, मग ते लवकर येतात, असं पत्र या शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे.       

दरम्यान यावर आता मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देणार का हे पाहणं गरजेचं ठरेल. राज्यात आधीच पावसाने पाठ फिरवल्यानं दुष्काळाचं सावट बळीराजावर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगाचा पोशिंदा हा काळजीत सापडल्याचं चित्र सध्या आहे. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाची आत्महत्या

[ad_2]

Related posts