Grah Gochar will happen in the month of November 5 planets will give wealth to these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Grah Gochar 2023 November: नोव्हेंबर महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नोव्हेंबर महिना हा ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे विशेष मानला जातोय. 

ज्योतिष शास्त्रात नोव्हेंबर महिन्यात शनी देव मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय शुक्र, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार आहे. दरम्यान या महिन्यात बुध ग्रह देखील दोन वेळा राशी बदलणार आहे. ग्रहांच्या स्थितीतील बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच परिणाम होणार आहे. यावेळी नोव्हेंबर महिना या 3 राशींसाठी खूप खास असणार आहे. जाणून घेऊया नोव्हेंबर महिना कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लकी ठरणार आहे.

ग्रह गोचर नोव्हेंबर 2023

शुक्र ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश (Shukra Gochar In Kanya Rashi)

ज्योतिष शास्त्रानुसार धनाचा दाता शुक्र 3 नोव्हेंबरला पहाटे 4:58 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्राच्या या गोचरमुळे विशेष लाभ मिळू शकणार आहे.

शनी देव कुंभ राशीत होणार मार्गस्थ (Shani Margi In Kumbh)

कर्म दाता शनि सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. ते 4 नोव्हेंबर रोजी रात्री 8:26 वाजता कुंभ राशीत मार्गस्थ होणार आहे. कुंभ राशीत शनी मार्गी झाल्यामुळे मेष, वृषभ, तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. यावेळी पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. 

बुध ग्रहाचा वृश्चिक राशीत होणार प्रवेश (Budh Gochar In Vrishchik )

बुध, बुद्धिमत्तेचा ग्रह 06 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4.11 वाजता मंगळाच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. दोन ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. बुधाच्या या गोचरमुळे वृषभ, कर्क, सिंह, धनु यासह काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात गुंतवणूक केल्यास नफा मिळू शकेल.

सूर्याचं वृश्चिक राशीत गोचर (Surya Gochar In Vrishchik)

ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. त्यानुसार 17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना आयुष्यात अपार यश मिळेल.

बुध ग्रहाचं धनु राशीत गोचर ( Budh Gochar In Dhanu)

ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबरच्या शेवटी बुध ग्रह पुन्हा एकदा आपली राशी बदलणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 05:41 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. 28 डिसेंबर 2023 पर्यंत या राशीत राहणार आहे.

नोव्हेंबरमध्ये होणारं ग्रहाचं गोचर या राशींसाठी ठरणार लाभदायक

ज्योतिष शास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात अनेक शुभ योग दिसून येणार आहेत. यावेळी शनी, शुक्र, सूर्य आणि बुध हे राशी बदलणार आहेत. या ग्रहांच्या राशी बदलामुळे नोव्हेंबर महिना काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या महिन्यात मेष, वृषभ, कुंभ, तूळ आणि कर्क राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. त्याचसोबत कामाचा विचार करता तुम्हाला पगारवाढीसोबत प्रमोशन मिळू शकते. व्यापारात अनेक मोठे सौदे केले जाऊ शकतात.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts