Agriculture News Onion Price Has Increased In Nashik   

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी कांदा आहे, त्यांना फायदा होत आहे. दरम्यान, सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदाच शिल्लक नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी त्याला दर नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आली आहे.

दर आहे पण कांदा नाही

कांद्याच्या दराच्या बाबतीत सध्या शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. कांद्याला भाव वाढले पण कांदा शिल्लक नसल्याचे दुःख शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी 4 हजार 800 ते जास्तीत जास्त 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांकडे मात्र, विक्रीसाठी कांदा शिल्लक नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक राहिलेला नसताना कांद्याचे भाव आता चांगलेच वधारु लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 4 हजार 800 रुपये तर जास्तीत जास्त 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे..

फारच कमी शेतकऱ्यांना लाभ

भाववाढीच्या आशेत शेतकऱ्यांचा बहुतांश कांदा यापूर्वीच विकला गेला आहे. तर ठेवलेला काही कांदा सडल्यानं शेतकऱ्यांकडे फारच कमी कांदा शिल्लक राहिला आहे. भाव वाढल्याचा आनंद एका बाजूला, तर दुसरीकडे कांदा शिल्लक राहिला नसल्याचे दुःख शेतकऱ्यांना असल्यानं शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव वाढण्याचे संकेत मिळू लागले असतानाच शासनाने निर्यात शुल्क वाढवत शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरवले. आता कांद्याचे भाव वाढले असले तरी कांदा संपल्यात जमा असल्याने या भाववाढीचा शेतकऱ्यांना जो लाभ व्हायला पाहिजे होता, तो आता फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे.

बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटली 

दरम्यान, शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने बाजार समितीत कांद्याची आवक पूर्णपणे घटली आहे. तसेच देशांतर्गत पुरवठा होत नसल्यानं तिकडे मागणी वाढल्यानं कांद्याच्या दरात वाढ होत आहे. उन्हाळ कांदा संपून लाल कांद्याला बाजारात यायला अजून एक महिना अवकाश असल्यानं भविष्यातही कांद्याचे दर हे चढेच राहणार आहेत. 

आठवडाभरात कांद्याच्या दरात 50 टक्क्यांची वाढ

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत. कारण कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपये किलो आहेत. तर आठवडाभरापूर्वी कांदा 30 ते 40 रुपये किलोने मिळत होता. आठवडाभरात कांद्याच्या दरात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत आणि दुसरीकडे मतदानापूर्वीच कांद्याच्या भावात तेजी आली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये नवीन पीक येण्यापूर्वी महागड्या कांद्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. पुढील काही दिवस कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Onion Price Hike: आठवडाभरात कांद्याच्या दरात 50 टक्क्यांची वाढ, सरकारनं हस्तक्षेप करुनही दरवाढ कायम

[ad_2]

Related posts