[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
वसई-विरार: वसई विरारकरांच्या (Vasai Virar) पाणी प्रश्नासाठी (Water Issue) एक केस घ्यावी लागली तरी ती मी घेईन असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Raj Thackeray) यांनी आज विरार येथे केलं आहे. वसई विरारकरांच्या पाण्यासाठी आज वसई विरार महानगरपालिकेवर महामोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व राजे ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले.
वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात मुबलक पाणी आहे. सध्या वसई-विरारकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त 165 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यातील 80 एमएलडी आता मिळू शकते. मात्र, नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने अतिरिक्त पाणी वितरीत होत नाही आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आक्रमक झाले असताना, आज शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने पालिकेवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. काही महिलांनी डोक्यावर कळशी घेवून या मोर्चात सहभागी झाले होते. शर्मिला ठाकरे यांनी ‘एबीपी’शी बोलताना सांगितले की, येत्या पाच दिवसात वसई विरारकरांना अतिरिक्त मिळणार पाणी पुरवठा सुरू नाही केला, तर मनसेचे पदाधिकारी स्वतः पाणीपुरवठा सुरू करतील. त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होणार असल्याचे सांगून, यासाठी माझ्यावर एक केस झाली तरी चालेल असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
यंदा पाऊस चांगला पडून ही तीव्र पाणी टंचाईचा सामना वसई -विरारकरांना करावा लागत आहे. दोन ते तीन दिवस पाणी येत नाही. त्यामुळे विशेषतः महिला वर्गाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. दरवर्षी वसई-विरारमध्ये पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात होते. या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी महिला वर्गांने केली आहे.
वसई-विरारला सध्या उसगांव धरणातून 20 एमएलडी, पेल्हार धरणातून 10 एमएलडी, पापडखिंड धरणातून एक एमएलडी त्याचबरोबर सुर्या प्रकल्प एक मधून 100 एमएलडी तर सुर्या प्रकल्प तीनमधून 100 एमएलडी असे एकूण 231 एमएलडी पाणी पुरवठा होतो. वास्तविक शहराची वाढती लोकसंख्या पाहिली असता, शहराला दररोज 372 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सुर्या प्रकल्प दोन अंतर्गत वसई विरार शहराला 165 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्यात पालिकेची विरारच्या काशिद कोपर पर्यंत पाईपलाईन टाकण्याचं काम झालं आहे. त्यामुळे जुलै महिन्यात 80 एमएलडी पाणी पुरवठा झाला पाहिजे होता. उर्वरित पाणी पुरवठ्याचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे 80 एमएलडी पाणी पुरवठा हा केवळ नेत्याच्या उद्घाटनाअभावी रखडला आहे.
[ad_2]