Pakistan Vs South Africa | Pakistan Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानचं ‘ऑपरेशन ऑल आऊट’ नक्की; मारक्रमने नांगर टाकत तोंडातला घास हिरावला! 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : चेन्नईतील चेपाॅक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचं वर्ल्डकप स्पर्धेतून ऑपरेशन ऑल आऊट नक्की केलं आहे. मधल्या फळीतील एडन मारक्रमच्या झुंजार 91 धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह दक्षिण गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानने दिलेल्या 270 धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेनं सहज पार केला. टाॅप ऑर्डर स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मारक्रमने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाचा विजय निश्चित केला. त्याने 91 धावांची खेळी केली. त्याला उसमा मीरने विजयासाठी 21 धावांची गरज असताना बाद करत रंगत निर्माण केली, पण तबरेज शमसी आणि केशव महाराजने विजय निश्चित केला. 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच आपला डाव सांभाळता आला नाही. 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली, जो 9 धावा करून बाद झाला. यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुसरा सलामीवीर इमाम उल हक 12 धावा काढून बाद झाला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दोन्ही पाकिस्तानी सलामीवीरांची शिकार केली. त्यानंतर कर्णधार बाबर आणि फलंदाज रिझवान यांनी काही काळ डाव रोखून धरला आणि तिसर्‍या विकेटसाठी त्यांच्यात 48  धावांची भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला (31) बाद करून मोडून काढले. 

त्यानंतर पाकिस्तानची चौथी विकेट 25.1 षटकात इफ्तिखार अहमदच्या रूपाने पडली, जो 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार बाबर आझम 28व्या षटकात 50 धावांवर फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीसाठी सौद शकील आणि शादाब खान यांनी सहाव्या विकेटसाठी 84 धावांची (71 चेंडू) भागीदारी करून संघाला काहीशी स्थिरता मिळवून दिली. कोएत्झीने 40व्या षटकात शादाब खानला (43) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानचा धावगती कमी केली.

त्यानंतर चांगली खेळी खेळत असलेला सौद शकील 43व्या षटकात 52 धावा काढून बाद झाला. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी 02 धावा करून 10वी विकेट म्हणून बाद झाला, चांगल्या खेळीकडे वाटचाल करणाऱ्या मोहम्मद नवाजने 24 आणि वसीम ज्युनियरने 7 धावा केल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

[ad_2]

Related posts