Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange Patil Over Maratha Reservation Uddhav Thackeray BJP Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange Patil: उद्धव ठाकरेंमुळेच (Uddhav Thackeray) मराठा आरक्षण (Maratha Reservation) गेल्याचा थेट आरोप भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात (Maharashtra News) आले, पण मराठा आरक्षणाबाबत चकार शब्दी न काढल्याच्या विरोधकांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाची पूर्ण प्रक्रिया राज्य सरकारनं करायचीय, जो प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीत असेल, त्या प्रश्नावर केंद्र सरकार कसा हात घालेल? असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. 

आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपनंही लोकसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली असून, महाविजय संकल्प 2024 साठी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाविजय संकल्प दौरा सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून पालघर लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत काल (शुक्रवार) पालघर लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवास केला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, घर चलो अभियानातंर्गत स्थानिक नागरिकांशी तसेच आनंद नगर मार्केटमध्ये दुकानदारांशी देखील संवाद साधला होता. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः केरळच्या प्रसिद्ध चेंदा वाद्यात मंजीरा वाजवून उत्साह वाढवला. 

मराठा आरक्षणाची पूर्ण प्रक्रिया राज्य सरकारनं करायचीय : चंद्रशेखर बावनकुळे 

पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात मोदी आल्यावर काहीच बोलले नाही या विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिलं. मराठा आरक्षणाची पूर्ण प्रक्रिया राज्य सरकारनं करायची आहे. जो प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीत असेल, त्या प्रश्नावर केंद्र सरकार कसा हात घालेल? राज्य सरकारनं संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर केंद्र सरकार त्या प्रकरणात हात घालेल. उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेल्याचा आरोपही यावेळी बोलताना बावनकुळे यांनी केला आहे. 

हृदयापासून सांगतोय आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय : चंद्रशेखर बावनकुळे 

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी बोलताना, कुणाला आमच्यावर विश्वासच ठेवायचा नसेल तर काय? मात्र आम्ही इमानदारीनं, हृदयापासून सांगतोय आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आरक्षण द्यायाचं नसेल तर चंद्रकात पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी येवढं लक्ष घातलं नसतं.  मराठा आरक्षण राजकारणाचा हा मुद्दा नसून, हा तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा झाला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

गुणरत्न सदावर्ते आणि भाजपचा काहीही संबंध नाही : चंद्रशेखर बावनकुळे 

गुणरत्न सदावर्ते आणि भाजपचा काहीही संबंध नाही. सदावर्ते ते आपल्या परीनं लढत आहेत. उगाच आमचं नाव लावलं जातंय असं सांगून, विरोधी पक्ष जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर रामदास कदम आणि नारायण राणे यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र नको, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. 

दरम्यान, वसई विरारच्या पाणी प्रश्नावर बोलताना, आज मला याबाबत नागरीकांनी पत्र दिलं आहे. उद्घाटनाबाबत आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून, यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं. 

[ad_2]

Related posts