ICC Cricket World Cup 2023 Australia Bowled Out For 388 Against New Zealand GLENN PHILLIPS Phillips 3 Wickets

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धरमशाला : विश्वचषकमधील 27 व्या सामन्यात धरमशालामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात लढत सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 388 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मात्र, कांगारू संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 4 चेंडू शिल्लक असताना सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी मोठी खेळी केली. त्याचवेळी न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 10 षटकांत केवळ 37 धावा देताना तीन विकेट घेतल्या. 

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्णय चांगलाच अंगलट आला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी अवघ्या 19.1 षटकांत 175 धावांची झटपट भागीदारी करून दाणादाण उडवली. डेव्हिड वॉर्नर (81) ग्लेन फिलिप्सचा बळी ठरला, आणि न्यूझीलंडची सामन्यात वापसी झाली. 

ऑस्ट्रेलियाने आज 20व्या षटकापूर्वीच 175 धावांचा टप्पा ओलांडल्याने किती मोठ्य़ा धावसंख्येचा रेकाॅर्ड करणार? याचीच चर्चा रंगली होती. मात्र, फिलिप्सने टाकलेल्या निर्णायक 10 षटकांमुळे धावगतीला काहीसा ब्रेक लागला. अन्यथा आजच्या सामन्यात वर्ल्डकपच्या इतिहासातील मोठे पराक्रम निश्चित होते. ऑस्ट्रेलिया चारशे धावांपासून 12 धावा दूर राहिला, पण फिलिप्स फिका पडला असता, तर हीच धावसंख्या साडे चारशेच्या घरात गेली यात शंका नाही. 

ऑस्ट्रेलियासाठी चौथे वेगवान वनडे शतक

वॉर्नर बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या 59 चेंडूत शतक झळकावून ऑस्ट्रेलियासाठी चौथे जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. शतकानंतर तो ग्लेन फिलिप्सचाही बळी ठरला. ट्रॅव्हिस हेडने 67 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 7 षटकार मारले.

ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बाकीचे फलंदाज खेळपट्टीवर फार काळ टिकू शकले नाहीत. मधल्या फळीपासून खालच्या फळीपर्यंतचे फलंदाज लहान खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. मिचेल मार्श 51 चेंडूत 36 धावा करून सॅन्टनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी 18 धावांची खेळी खेळली. तथापि, ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 41 धावा, जोस इंग्लिसने 28 चेंडूत 38 धावा आणि कर्णधार पॅट कमिन्सने 14 चेंडूत 37 धावांची जलद खेळी करत ऑस्ट्रेलियाला 400 च्या जवळ नेले.

ग्लेन फिलिप्सची अप्रतिम गोलंदाजी

अखेरीस मिचेल स्टार्क (1) आणि अॅडम झाम्पा (0) यांना फारशी साथ देता आली नाही. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 49.2 षटकात 388 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्टने 3-3, मिचेल सँटनरने 2 आणि मॅट हेन्री आणि जेम्स नीशमने 1-1 बळी घेतला. ग्लेन फिलिप्सने येथे कौतुकास्पद गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात केवळ 37 धावा देत 3 बळी घेतले. आजच्या सामन्यात त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व गोलंदाजांना चांगलाच फटका बसला.

एकदिवसीय क्रिकेटमधील टाॅप 10 सर्वोच्च धावसंख्या 

1) इंग्लंड – 2022 मध्ये अॅमस्टेल्वीन येथे नेदरलँड्सविरुद्ध 50 षटकात 498/4.
2) इंग्लंड – 2018 मध्ये नॉटिंगहॅम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 षटकात 481/6.
3) इंग्लंड – 2016 मध्ये नॉटिनहॅम येथे पाकिस्तानविरुद्ध 50 षटकात 444/3.
4) श्रीलंका – 2006 मध्ये अॅमस्टेलवीन येथे नेदरलँड्सविरुद्ध 50 षटकात 443/9.
5) दक्षिण आफ्रिका – 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 50 षटकात 439/2.
6) दक्षिण आफ्रिका – 2006 मध्ये जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 49.5 षटकात 438/9.
7) दक्षिण आफ्रिका – 2015 मध्ये मुंबईत भारताविरुद्ध 50 षटकात 438/4.
8) ऑस्ट्रेलिया – 2006 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 षटकात 434/4.
9) दक्षिण आफ्रिका – 2023 मध्ये दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध 50 षटकात 428/5.
10) दक्षिण आफ्रिका – 2006 मध्ये पॉचेफस्ट्रूम येथे झिम्बाब्वे विरुद्ध 50 षटकात 418/5.
10) भारत – 2011 मध्ये इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 50 षटकांत 418/5.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts