[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवार (28 ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात 51 हजार नियुक्ती पत्रांचे केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘आता नोकरी मिळवणं हे अगदी सोपं झालं आहे. रोजगार मेळावा हा या महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे. मागील वर्षात ऑक्टोबर महिन्यात आपण या रोजगार मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून भाजप शासित राज्यामध्ये या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं.’
आतापर्यंत लाखो तरुणांना सरकारी नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. आजदेखील 50 हजार युवकांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. दिवळीसाठी अवघे काही दिवस राहिलेत. पण नियुक्ती पत्र वाटल्यानंतर या तरुणांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस दिवळीपेक्षा काही कमी नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतातील प्रत्येक क्षेत्रात रोजगार निर्माण
देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित करण्यात आलेले रोजगार मेळावे हे तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहेत. आमचे सरकार तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन मिशन मोडमध्ये काम करत आहे. आम्ही केवळ रोजगारच देत नाही, तर संपूर्ण व्यवस्था पारदर्शक ठेवत आहोत. भारत ज्या दिशेने वाटचाल करत आहे आणि ज्या गतीने वाटचाल करत आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.
धोर्डोबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान म्हणाले, ‘गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या धोर्डो गावाला यूएनने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरविले आहे. यापूर्वी कर्नाटकातील होयसाळ मंदिरे आणि पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनला जागतिक वारसा स्थळाची मान्यता मिळाली आहे. यामुळे येथील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेच्या विस्ताराची क्षमता किती वाढली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. युवाशक्ती जितकी प्रबळ असेल तितका देशाचा विकास होईल. आज भारत आपल्या तरुणांना कौशल्य आणि शिक्षणाच्या नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करत आहे.’
[ad_2]