29 October In History Divishesh Maharshi Dhondo Keshav Karve Awarded By Bharat Ratna Today In History Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.आजच्यात दिवशी  बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान झाले होते. तसेच महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 29 ऑक्टोबर 1931 रोजी साहित्यिक आणि पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म झाला होता. 

1922: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

बेनिटो अमिलकेअर आंद्रिया मुसोलिनी  एक इटालियन हुकूमशहा आणि पत्रकार होता ज्याने नॅशनल फॅसिस्ट पार्टी (PNF) ची स्थापना केली आणि त्याचे नेतृत्व केले . 1922 मध्ये रोमवरील मार्चपासून ते 1943 मध्ये पदच्युत होईपर्यंत ते इटलीचे पंतप्रधान होते , तसेच 1919 मध्ये इटालियन फॅसेस ऑफ कॉम्बॅटच्या स्थापनेपासून ते इटालियन पक्षकारांकडून 1945 मध्ये त्यांची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत इटालियन फॅसिझमचे ” ड्यूस ” होते . इटलीचा हुकूमशहा आणि फॅसिझमचे प्रमुख संस्थापक म्हणून, मुसोलिनीने आंतर-युद्ध कालावधीत फॅसिस्ट चळवळीच्या आंतरराष्ट्रीय प्रसाराला प्रेरणा दिली आणि पाठिंबा दिला .

1958 :  महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान

धोंडो केशव कर्वे यांनी महिला कल्याणाच्या क्षेत्रातील समाजसुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. कर्वे विधवांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते. त्यांनी 1916 मध्येभारतातील पहिले महिला विद्यापीठ,SNDT महिला विद्यापीठ स्थापन केले. तर 1958 मध्ये, त्यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी मुलींसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ हा अनाथाश्रम सुरू केला. सर्व महिलांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा त्यांचा मानस होता.त्यांच्या प्रयत्नातून 20 व्या शतकात पहिले महिला विद्यापीठ स्थापन झाले. 

1931: साहित्यिक आणि पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म

प्रभाकर ताम्हणे यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला. त्यांच्या विनोदी शैलीतल्या कथांमुळे ते अधिक लोकप्रिय झाले. गरवारे महाविद्यालयातील  मराठीचा प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांची प्राध्यापकी सांभाळून त्यांनी अनेक कथा आणि कांदबऱ्या लिहिल्या. ‘अशीच एक रात्र येते’ हे त्यांचं नाटक चांगलंच गाजलं. त्यानंतर या नाटकाचे  हिंदी, गुजराती, पंजाबी आणि कोकणी भाषांमध्ये अनुवादही झाले  त्यांनी लिहिलेले एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळी काळोखाची यांसारखे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यांनी लिहिलेल्या कथेवर राज कपूरने काढलेला ‘बीवी ओ बीवी’ हा विनोदी सिनेमाही गाजला होता. अनामिक नाते, छक्केपंजे, एक कळी उमलताना, घडीभरची वस्ती, हुंडा पाहिजे, जीवनचक्र, लाइफमेंबर, पुनर्मीलन, सांगू नको साजणी, मध्यरात्री चांदण्यात, तो स्पर्श… तो सुगंध, दिनू, हिमफुलांच्या देशात, हा स्वर्ग सात पावलांचा, माझ्या बायकोचा नवरा, मध्यरात्री चांदण्यात, रात्र कधी संपूच नये, संगीत प्रेमबंधन असे त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत. 7 मार्च 2000 मध्ये प्रभाकर ताम्हणे यांनी अखेरचा श्वास घेतला. 

1981 : अभिनेते दादा साळवी यांचे निधन 

 दिनकर शिवराम साळवी उर्फ दादा साळवी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील फणसोबमध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश केला. ते गावात सणासुदीला आणि जत्रेमध्ये नाटकातून कामही करत होते. नाटककार टिपणीस यांनी त्यांचे काम पाहिले आणि ते साळवींना घेऊन मुंबईत आले. के.बी. आठवले हे त्या वेळेस शेठ वझीर अझीज यांच्या एक्सलसिअर फिल्म कंपनीत व्यवस्थापक, नट आणि दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्यांनी साळवी यांना २५ रु. पगारावर कंपनीत नोकरीस तत्काळ घेतले. ‘खून-ए-नाहक’ (1928) या पहिल्या मूकपटात साळवी यांना भूमिका दिली.. इंपीरियलमध्ये साळवींनी ‘मदनमंजरी’, ‘इंदिरा बी.ए.’, ‘भोलाशिकार’, ‘सिनेमा गर्ल’, ‘हमारा हिंदुस्थान’, ‘रात की बात’, ‘खुदा की शान’ असे पंधरा-वीस मूकपट केले. तसेच पॅरामाऊंट फिल्म कंपनीसाठी जयंत देसाई दिग्दर्शित ‘पोलादी पेहलवान’ हा चित्रपट केला.‘आलम आरा’ या पहिल्या बोलपटातही दादा साळवी यांनी काम केलं होतं. ‘औट घटकेचा राजा’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘छत्रपती संभाजी’, ‘ठकसेन राजपुत्र’ हे चित्रपट त्यांनी केले. त्यांनी नायिका सखूबाईशी यांच्याशी प्रेमविवाह केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांचा हा पहिला प्रेमविवाह होता. त्या वेळेस हा विवाह चर्चेचा विषय ठरला होता. 29 ऑक्टोबर रोजी दादा साळवी यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. 

2005 : दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये 60 पेक्षा जास्त व्यक्ती ठार

भारताच्या इतिहासात 29 ऑक्टोबर ही तारीख एका दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवली जाते. दिवाळीच्या उत्सव असतानाच 29 ऑक्टोबर 2005 मध्ये दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. दिल्लीमधील बॉम्बस्फोटमुळे देशातील दिवाळी उत्सव दु:खामध्ये बदलला होता. ऑक्टोबरमध्ये दिल्लीमध्ये मोठे मोठे उत्सव असतात. रामलीला, दसरा, दिवळी यासर गोवर्धन पूजा यासारख्या उत्सवात राजधानी दिल्ली व्यस्त असते. एकापाठोपाठ येणाऱ्या उत्सवामुळे दिल्लीमध्ये गर्दी असते. हीच संधी साधत 29 ऑक्टोबर रोजी धनतेरसच्या दिवळी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 60 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. 

इतर महत्त्वाच्या घडामोडी 

1911 : अमेरिकेतील प्रसिद्ध संपादक आणि प्रकाशक जोसफ पुलित्‍जर यांचं निधन
1923 : तुर्कस्तान देशाचा प्रजासत्ताक दिवस 
1933 : फ्रान्सचे माजी पंतप्रधान पॉल पेनलिव्ह यांचे निधन
1985 : बॉक्सर विजेंद्र सिंह यांचा जन्मदिवस
1989 : क्रिकेटपटू वरून आरोनचा जन्म 
1997: अभिनेते दिलीपकुमार यांना एनटी रामाराव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
1999 : ओदिसामध्ये चक्रिवादळ आल्यामुळे मोठं नुकसान

[ad_2]

Related posts