India Vs England Head To Head Record In ODI World Cup History Latest Marathi News Udpate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023, India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज अटीतटीचा सामना होईल. भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे तर इंग्लंडचा संघ स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चाचपडत आहे. भारतीय संघाने विश्वचषकातील पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवलाय. तर इंग्लंडला पाच सामन्यात फक्त एकच विजय मिळवता आलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत आणि नवव्या क्रमांकावर असणारा इंग्लंड यांच्यामध्ये आमनासामना होत आहे. विश्वचषक, वनडे आणि भारतामध्ये या दोन्ही संघात अनेकदा आमनासामना झालाय. यामध्ये कुणाचे पारडे जड आहे, काय सांगतेय हेड टू हेड आकडेवारी, पाहूयात…

वनडेमध्ये कुणाचे पारडे जड –  England vs India Head-to-Head in ODI

वनडे सामन्याचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत  106 सामने झाले आहेत. भारतीय संघाने 57 सामन्यात विजय मिळवला आहे तर इंग्लंडने 44 सामन्यात बाजी मारली आहे. तीन सामन्याचा निकाल लागला नाही. दोन सामने बरोबरीत सुटले.

विश्वचषकात इंग्लंड सरस – England vs India Head-to-Head in ODI World Cup

1975 पासून 2019 पर्यंत वनडे विश्वचषकात भारताविरोधात इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये इंग्लंड संघाने चार सामन्यात विजय मिळवला आहे तर भारताला तीन सामन्यात बाजी मारता आली आहे. एक सामना बरोबरीत राहिलाय. 

मायदेशात इंग्लंडविरोधात भारताची कामगिरी, England vs India Head-to-Head –

भारताने इंग्लंडविरोधात मायदेशात 51 वनडे सामने खेलले आहे. भारतीय संघाने 33 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 17 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. भारतीय संघ मायदेशात इग्लंडपेक्षा वरचढ दिसत आहे. भारताने इंग्लंडविरोधात अखेरचा वनडे सामना पुण्याच्या स्टेडिअमध्ये खेळला होता.  या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला होता. 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारताने 2-1 विजय मिळवला होता. 

गुणतालिकेतील दोन्ही संघाची स्थिती काय ?

जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला अतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने पाच सामन्यात फक्त दोन गुणांची कमाई केली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. भारताने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणार आहे. 

[ad_2]

Related posts